बिग बॉस मराठीच्या घरामधून अभिजीत केळकर बाहेर !

Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठीच्या घरामधून अभिजीत केळकर बाहेर !

बिग बॉस मराठी सिझन 2 चा या आठवड्यातील WEEKEND चा डाव विशेष होता आणि सदस्यांना सरप्राईझ देखील मिळाले… कारण मंचावर एंट्री झाली बॉलीवूडचा भाईजान आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सलमान खान याची… यामुळे मंचावर एक वेगळीच जान आली… महेश मांजरेकर यांनी सलमान खानचे स्वागत केले आणि मंचावर गप्पा रंगल्या…महेश मांजरेकर यांनी सलमानला पहिला चित्रपट कसा मिळाला हे विचारले आणि मग सलमाने त्यामागचा किस्सा सांगितला. महेश मांजरेकर यांनी सलमान खानसोबत मैत्री कशी झाली तो किस्सा सांगितला आणि या क्षेत्रात माझा एकच मित्र आहे आणि तो म्हणजे सलमान खान असे सांगितले. तर सदस्यांशी देखील बर्‍याच गप्पा मारल्या, त्यांना सल्ला दिला आणि बरीच मजा मस्ती केली… सगळ्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरणार हे निश्चित… पण अखेर तो क्षण आला जेंव्हा या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोणा एका सदस्याला घर सोडून जावे लागणार होते… आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे…. घरातील तीन स्ट्रॉंग सदस्य आणि एक नवा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले. अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे डेंजर झोनमध्ये आले होते आणि अभिजीत केळकरला या आठवड्यामध्ये घर सोडून जावे लागले… शिवला अश्रु अनावर झाले त्याला विश्वास ठेवणे अशक्य होते. घरातील प्रत्येक सदस्याला वाईट वाटले. पण नियमानुसार हे अनिवार्य असते. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडताना त्याने शिवला सल्ला दिला आणि अभिजीतने खास शिवसाठी गाणे म्हंटले… महेश मांजरेकर म्हणाले “मी तुला टॉप 5 मध्ये पहिले होते, पण घरामध्ये मतं मांडणारा आणि त्या मतावर ठाम राहणारा सदस्य बाहेर गेला” असे मी म्हणेन. बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर अभिजीत केळकरला त्याच्या आतापर्यंच्या प्रवासाची सुंदर AV दाखविली…

बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

 

Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2

Abhijeet Kelkar Evicted Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठीच्या घरामधून अभिजीत केळकर बाहेर !