‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेमध्ये लवकरच होणार आस्ताद काळेची एंट्री !

Aastad Kale Joins Chandra Aahe Sakshila

चंद्र आहे साक्षीला सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

चंद्र आहे साक्षीला मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. श्रीधरने स्वातीसोबत पळून जाऊन लग्न केले. त्याने रचलेल्या जाळ्यात स्वाती पुरेपूर अडकली आणि तिने लग्नास होकार दिला… आता कुठे स्वाती आणि श्रीधरच्या संसाराला सुरूवात झाली होती… पण, श्रीधरचा खोटेपणा, तो लपवत असलेले सत्य आता स्वातीसमोर आले आहे. श्रीधरचा खरा चेहरा स्वातीसमोर आला आहे… स्वातीला एकच प्रश्न आहे की, श्रीधरने इतका मोठा विश्वासघात का केला ? श्रीधर आणि स्वातीचे नाते खर तर खोट्याच्या आधारावरच उभे होते, स्वातीची काहीच चूक नसताना तिला या सगळ्याला सामोरं जावं लागत आहे… श्रीधरवर जिवापाड प्रेम करणारी स्वाती श्रीधर आणि सुमनचं  खरं नातं सामोरं आल्याने एकटी पडली आहे… या सगळ्याला ती कशी सामोरी जाणार ? आलेल्या संकटाला ती कशी उत्तर देणार ? श्रीधरला शिक्षा मिळवून देणार ? असे अनेक प्रश्न समोर आले आहेत… पण या सगळ्यामध्ये आता मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे… म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका आस्ताद काळे… आता मालिकेमध्ये त्याची नक्की काय भूमिका असणार आहे ? त्याच्या येण्याने नक्की काय घडेल ? श्रीधर – स्वातीच्या आयुष्यात काय उलथापालथ होईल ? हे सगळे बघणे उत्सुकतेचे असणार आहे….

आस्तादच्या भूमिकेचे नाव, त्याची भूमिका काय असेल हे अजून तरी गुलदस्त्यात आहे… लवकरच प्रेक्षकांना समजेल… पुढे मालिकेत काय घडत हे जाणून घेण्यासाठी बघत रहा चंद्र आहे साक्षीला सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Aastad Kale Joins Chandra Aahe Sakshila Aastad Kale Joins Chandra Aahe Sakshila Aastad Kale Joins Chandra Aahe Sakshila