Home News मी कात टाकली मालिकेची गूढ गोष्ट उलगडणार कॉमिक बुकच्या माध्यमातून | Me...

मी कात टाकली मालिकेची गूढ गोष्ट उलगडणार कॉमिक बुकच्या माध्यमातून | Me Kaat Takli

Star Pravah Me Kaat Takli In A Comic Book

स्टार प्रवाहचा अनोखा प्रयोग! ‘मी कात टाकली’ची गूढ गोष्ट उलगडणार कॉमिक बुकच्या माध्यमातून

मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच केला जातोय हटके प्रयत्न

एखादी गोष्ट ऐकताना उत्सुकता निर्माण होते, ती पाहताना त्यात रमायला होतं. बहुचर्चित मी कात टाकली मालिकेची ओळख करून देण्यासाठी स्टार प्रवाहने अनोखा प्रयत्न केला आहे. मालिकेची कथा केवळ प्रोमो आणि पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत न पोहोचवता, थेट कॉमिक बुकच्या माध्यमातून उलगडण्यात येत आहे. मराठी मालिका विश्वात पहिल्यांदा हा प्रयोग केला जातोय. मालिकेच्या प्रमुख व्यक्तिरेखांपासून तेकथेत दडलेल्या अनेक गूढ रहस्यांपर्यंत अनेक महत्त्वाचे धागे या कॉमिक बुकमधून रंजक पद्धतीने मांडण्यात येत आहेत. न्यू-एज स्टोरीटेलिंगचा हा भन्नाट प्रयोग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

या अनोख्या प्रयोगाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय़ प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘नव्या पिढीसाठी सतत काहीतरी नवीन घडवत राहावं लागतं. मालिकेची गोष्ट नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्य़ासाठी स्टार प्रवाहच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही कॉमिक सीरिज उपलब्ध केलीय. पूर्वी आपण कॉमिक बुक्स वाचायचो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नव्या रुपात आम्ही कॉमिक सीरिज भेटीला आणलीय. सध्याच्या वेगवान आयुष्यात तितकंच वेगवान आणि आधुनिक स्टोरीटेलिंगचं टूल या माध्यमातून वापरलं आहे. कथेची गूढता वाढवण्यात त्याची मदत होत आहे.

Star Pravah Me Kaat Takli In A Comic Book