Home Movies आई–मुलींच्या नात्यावर आधारित ‘ तिघी ’चा ट्रेलर प्रदर्शित

आई–मुलींच्या नात्यावर आधारित ‘ तिघी ’चा ट्रेलर प्रदर्शित

tighi-marathi-movie-trailer.jpg

आगामी मराठी चित्रपट ‘ तिघी ’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आई आणि दोन मुलींच्या नात्यावर आधारित असून ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

आई आणि मुलींचं नातं हे नेहमीच भावनांनी भरलेलं आणि अनेक छटांनी गुंफलेलं असतं. कधी जिव्हाळा, कधी मतभेद, तर कधी न बोललेले भाव – या सगळ्यांचा वास्तववादी प्रवास उलगडणारा आगामी मराठी चित्रपट ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतो आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एका घरात राहणाऱ्या तीन स्त्रियांचं आयुष्य प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. आई आणि तिच्या दोन मुलींमधील नात्यातील ताणतणाव, छोट्या भांडणांतून व्यक्त होणाऱ्या भावना, अपूर्ण अपेक्षा आणि त्यामागची माया याचं वास्तववादी चित्रण यात पाहायला मिळतं.

ट्रेलरमध्ये तिन्ही स्त्रिया आपापल्या आयुष्यातील संघर्षांना सामोऱ्या जाताना दिसतात. मात्र आयुष्याच्या

Tighi Marathi Movie

एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्या एकमेकींसाठी कशा उभ्या राहतात, याची उत्सुकता ट्रेलर शेवटपर्यंत टिकवून ठेवतो.

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही चित्रपटाची टॅगलाईन ट्रेलरमध्ये ठळकपणे जाणवते. घर म्हणजे केवळ चार भिंती नसून त्यात साठलेल्या आठवणी, तुटलेले संवाद आणि पुन्हा जुळणारी नाती यांचं प्रतीक म्हणून ते समोर येतं.

ट्रेलर लाँच सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासाठी खास सरप्राईज ठेवण्यात आले होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी व्हिडिओ

Tighi

संदेशाद्वारे चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गायिका प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांनी चित्रपटातील गाणी सादर केली.

या कार्यक्रमाला नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, जिजीविषा काळे, जितेंद्र जोशी, निलेश मोहरीर, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे तसेच अभिनेत्री गिरिजा ओक उपस्थित होत्या.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी सांगितले की, आई–मुलींचं नातं अनेक भावनिक स्तरांनी बनलेलं असतं आणि ‘तिघी’मधून या नात्याची खरी आणि प्रामाणिक बाजू दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला या कथेत स्वतःचं घर आणि नातं जाणवेल, असा त्यांचा विश्वास आहे.

Tighi Trailer Launch

या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जिजीविषा काळे यांनी केले आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

आई–मुलींच्या नात्याकडे संवेदनशील दृष्टीकोनातून पाहणारा ‘तिघी’ हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

tighi-marathi-movie-trailer.jpg

Tighee Movie IMDB Page

Keywords : Tighi, Tighee, Tighi Trailer Launch, Tighee Trailer, Tighi Trailer, Tighi Marathi Movie, Tighee Marathi Movie, Upcoming Marathi Movie, Neha Pendse, Sonalee Kulkarni, Bharati Achrekar, Bharati Aacharekar