लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवर पुन्हा भेटीला आल्या आहेत राजा शिवछत्रपती आणि आंबटगोड या मालिका

Raja ShivChhatrapati and Aambat Goad
लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवर पुन्हा भेटीला आल्या आहेत राजा शिवछत्रपती आणि

कोरोनाचं संकट सध्या संपूर्ण जगावर थैमान घालत आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे मालिकांचं शूटिंगही थांबलं आहे. या कठीण काळात सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं आहे. मात्र लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती आणि आंबटगोड या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. सध्याच्या नकारात्मक वातावरणात या दोन्ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच नवी उभारी देतील. शुक्रवार ३ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ५ वाजता आंबटगोड आणि ५.३० वाजता राजा शिवछत्रपती या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतो. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केलं आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले मालिकेचं शीर्षकगीत प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामनात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, मृणाल कुलकर्णी यांच्या जिजाऊ, अविनाश नारकर यांचे शहाजी राजे, यतीन कार्येकर यांचा औरंगजेब आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हेच सोनेरी क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येत आहेत.

तर आंबटगोड मालिकेतून विध्वंस वाड्याची धमाल आणि राया अबोलीचं आंबटगोड नातं पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तेव्हा पाहायला विसरु नका दररोज सायंकाळी ५.०० वाजता आंबटगोड आणि ५.३० वाजता राजा शिवछत्रपती.

 

Raja ShivChhatrapati and Aambat Goad Raja ShivChhatrapati and Aambat Goad

Raja ShivChhatrapati and Aambat Goad
लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवर पुन्हा भेटीला आल्या आहेत राजा शिवछत्रपती आणि