‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर गायक आनंद शिंदे यांनी प्रतीकला आशिर्वाद म्हणून दिली भेटवस्तू

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर गायक आनंद शिंदे यांनी प्रतीकला आशिर्वाद म्हणून दिली भेटवस्तू

पहा, ‘इंडियन आयडल मराठी’ सोमवार-बुधवार, रात्री 9 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमात आपल्या पहाडी आवाजानी आणि वेगळ्या गायनशैलीनी प्रतीक सोळसे या स्पर्धकानं पहिल्या भागापासून प्रेक्षकांबरोबरच परीक्षक अजय-अतुल यांच्याही मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. प्रतीक हा ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांचा खूप मोठा चाहता आहे. ‘इंडियन आयडल मराठी’च्या आगामी भागात अजय-अतुल यांनी वचन दिल्याप्रमाणे प्रतीकची भेट प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्याशी घडवून आणल्याने प्रतीकची स्वप्नपूर्ती झाली आहे आणि याच मंचावर या अनोख्या गुरु-शिष्यांचं एकत्र सादरीकरणही बघायला मिळणार आहे.

‘इंडियन आयडल मराठी’चा आगामी भाग हा लोकसंगीत विशेष असणार आहे. या भागात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे उपस्थित राहणार आहेत. आनंद शिंदे यांनी आल्या आल्या ‘मी केवळ प्रतीकला भेटण्यासाठी आलो आहे’ असं जाहीर केल्यानं प्रतीकचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्या वेळी अजय-अतुल यांनी आनंद शिंदे यांना सांगितलं की, ‘तुमची ही भेट प्रतीकच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी काहीतरी आठवण त्याला द्या.’  आनंद शिंदे यांनी स्वत:च्या हातातलं घड्याळ काढून देत सांगितलं की, ‘प्रतीक माझा एकलव्यासारखा शिष्य आहे. या घड्याळामुळे प्रतीकच्या आयुष्यातली चांगली वेळ आता सुरू होईल.’ त्यानंतर आनंद शिंदे गाणं सादर करत असताना त्यांनी प्रतीकला त्यांच्याबरोबर गाण्यासाठी स्वत:हून बोलावून घेतलं. त्यामुळे ‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर प्रतीकचं गुरूबरोबर गाण्याचं स्वप्न खर्‍या अर्थानं पूर्ण झालं, असं म्हणता येईल.

या भागात स्पर्धक विविध प्रकारची लोकगीतं सादर करणार आहेत. पाहायला विसरू नका सोमवार ते बुधवार, रात्री 9 वाजता ‘इंडियन आयडल मराठी’, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर गायक आनंद शिंदे यांनी प्रतीकला आशिर्वाद म्हणून दिली भेटवस्तू 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर गायक आनंद शिंदे यांनी प्रतीकला आशिर्वाद म्हणून दिली भेटवस्तू 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर गायक आनंद शिंदे यांनी प्रतीकला आशिर्वाद म्हणून दिली भेटवस्तू