महाराष्ट्राची हास्यजत्रा – नवा हंगाम १९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर

Maharashtrachi Hasyajatra Nava Hangam Sony Marathi
१९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर सुरू होणार महाराष्ट्राची हास्यजत्रा - नवा हंगाम

“१९ ऑगस्टपासून तुम्ही अनुभवणार विनोदवीरांची नवी कमाल”

आनंदाचे आणि हास्याचे क्षण  देणाऱ्या हास्यजत्रेचा नवा हंगाम १९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर सुरू होणार आहे. सोनी मराठीवर लाँच झालेल्या प्रोमो मधून हास्यजत्रेतल्या गाजलेल्या स्पर्धकांच्या टोळीबरोबरच परीक्षकांची या मंचावरील धमाल दिसते. यावरून हास्यजत्रेचा नवा हंगाम पूर्वीच्या दोन पर्वांच्या तोडीस तोड असेल, याचा अंदाज येतो. या नव्या सिझनमध्ये दुसऱ्या पर्वाप्रमाणेच सोमवार – मंगळवार कलाकार स्पर्धक प्रेक्षकांना हसवतील तर इतर स्पर्धकांची विनोदबुध्दी बुधवार – गुरूवारी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या नव्या हंगामात सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक सोमवार – मंगळवारी सादर होणारे भाग जज करतील तर विनोदाचं अचूक टायमिंग असणारे मकरंद अनासपुरे आणि मेलोड्रामा क्वीन अलका कुबल बुधवार – गुरूवारच्या भागांत परीक्षकांच्या खुर्चीत बसणार आहेत. तर गेल्या दोन पर्वांची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी या पर्वातही सूत्रसंचालिकेची भूमिका बजावणार आहे.

दरम्यान हास्यजत्रेची गेली दोन पर्व सुपरहिट ठरली होती. दोन वेगळ्या गृपमध्ये भरलेल्या या विनोदाच्या जत्रेत बऱ्याच नवीन चेहऱ्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हास्यजत्रेतले हे स्पर्धक तिसरं पर्व ही सुपरहिट करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. तेव्हा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा हा नवा हंगाम पहायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर.

 

Maharashtrachi Hasyajatra Nava Hangam Sony Marathi
१९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर सुरू होणार महाराष्ट्राची हास्यजत्रा – नवा हंगाम