बिग बॉस मराठी सिझन २ दिवस १७ ! बिग बॉस मराठीच्या घरात आज दिले जाणार प्रेमाचे धडे

Bigg Boss Marathi Season 2
बिग बॉस मराठी सिझन २ दिवस १७ ! बिग बॉस मराठीच्या घरात आज दिले जाणार प्रेमाचे धडे

बिग बॉस मराठीच्या घरात रंगत आहे शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य … आज देखील बिग बॉसची शाळा भरणार आहे… या टास्कसाठी बिग बॉस यांनी टीम नेमून दिल्या आहेत आणि त्यानुसार शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सदस्यांना त्यांना नेमून दिलेले विषय विद्यार्थांना शिकवायचे आहेत. पराग कान्हेरे याला प्रेम शास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. आणि म्हणूनच आज या टास्कमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पराग प्रेमाचे धडे देणार आहे आणि ते सुद्धा प्रात्यक्षिक देऊन… यासाठी परागने रुपाली भोसलेसोबत डान्स सादर केला… ज्यावरून घरातील सदस्य पराग आणि रूपालीला बरेच चिडवताना दिसणार आहेत. “तेरे से मॅरेज करने को मै” या गाण्यावर पराग आणि रुपालीने डान्स केला आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आणि घराबाहेर रुपाली आणि परागबद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहेत… त्यात किती सत्य आहे हे त्यांनाच ठाऊक … पण हा डान्स आणि प्रेमशास्त्राचा क्लास घरातील सदस्यांनी बराच एन्जॉय केला आणि तो आज प्रेक्षक देखील करतील…

 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल काय घडले ?

विणा, किशोरी, पराग आणि रुपाली यांचा ग्रुप बराच चर्चेत आला आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या एकी आणि बॉन्डीगबद्दल घरातील सदस्य देखील चर्चा करताना दिसतात… ग्रुप तयार झाला कि प्रत्येक ग्रुपचे काही कोड वर्ड, साईन असतात… काल यांच्या ग्रुपने युनिटी, लव्ह आणि रिसपेक्ट यांच्यासाठी साईन तयार केल्या ज्यांचा वापर ते टास्क दरम्यान, अथवा घरामध्ये करताना दिसतीलच… तर शिवानी आणि किशोरी शहाणे मध्ये झालेला वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला… पण आता किशोरी शहाणे यांनी सगळे विसरून शिवानीची माफी मागितली आहे… जे तिने नेहाला देखील सांगितले… तर नेहा आणि शिव मध्ये देखील बराच वाद झाला… तर रुपालीने विद्याधर आणि माधव यांना शिक्षा केली…

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय घडणार ? विद्यार्थी बनून सदस्य काय दंगा घालणार हे नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Bigg Boss Marathi Season 2Bigg Boss Marathi Season 2