‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्ध-अरुंधतीचा विवाहसोहळा

Aniruddh And Arundhati's Wedding In Aai Kuthe Kay Karte

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. लवकरच मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. निमित्तही खास आहे या दोघांच्याही लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. त्यामुळेच संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन या दोघांचं लग्न पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेतला. अर्थात यात पुढाकार घेतला तो यश, इशा आणि अभिषेकने. आई- बाबांचं केळवण करण्यापासून ते अगदी मेहंदी, हळद, संगीत असे सगळे कार्यक्रम साग्रसंगीत पार पडले. आता उत्सुकता आहे ती अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या लग्नाची.  दोघांचा लग्नातला हा खास लूक आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. पारंपरिक वेषातला दोघांचाही अंदाज लक्ष वेधणारा आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, पारंपारिक दागिने असा वधूच्या रुपातला अरुंधतीचा लूक याआधी प्रेक्षकांनी कधीच पाहिलेला नाही. त्यामुळे मालिकेतला हा लग्नसोहळा खास ठरणार हे नक्की. प्रेक्षकांना या आठवड्यात हा विवाहसोहळा पाहायला मिळेल.

लग्नाच्या निमित्ताने जरी संपूर्ण कुटुंब आनंदात असलं तरी हा आनंद किती दिवस टिकणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल, कारण अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी हळूहळू सर्वांनाच कळलं आहे. अरुंधतीसमोरही हे सत्य उघड होणार आहे. त्यामुळे हे सत्य अरुंधती कसं पचवणार? तिच्या आयुष्याला नेमकी कशी कलाटणी मिळणार? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी न चुकता पाहा ‘आई कुठे काय करते’ सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Aniruddh And Arundhati's Wedding In Aai Kuthe Kay Karte Aniruddh And Arundhati's Wedding In Aai Kuthe Kay Karte Aniruddh And Arundhati's Wedding In Aai Kuthe Kay Karte Aniruddh And Arundhati's Wedding In Aai Kuthe Kay Karte