प्लास्टिक बंदी ! ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमचा स्तुत्य उपक्रम

Team Dr Babasaheb Ambedkar Bans Plastic
प्लास्टिक बंदी ! ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमचा स्तुत्य उपक्रम

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमने पर्यावरण रक्षणाच्या हेतूने एक पाऊल पुढे टाकलं आहे. निसर्गाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्णय या मालिकेच्या संपूर्ण टीमने घेतला आहे. यातलाच पहिला प्रयत्न म्हणजे सेटवर वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांच्या वापरावर केलेली बंदी. दशमी प्रोडक्शन आणि कलाकारांनी या निर्णयाला पसंती दर्शवली आणि सेटवर स्टीलच्या बाटल्या दाखल झाल्या. प्रत्येक बाटलीवर कलाकार, दिग्दर्शक आणि इतर टीमची नाव देण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकला अटकाव झालाय.

या अनोख्या उपक्रमाविषयी सांगताना तुळसाची भूमिका साकारणारी अदिती द्रविड म्हणाली,  ‘प्लास्टिकची समस्या किती गंभीर स्वरुपाची आहे हे आपल्या सर्वांनाचा माहित आहे. एक सुशिक्षित आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्याला या गोष्टीची जाणीव असायलाच हवी. या बदलाच्या दृष्टीने सुरुवात होणं गरजेचं आहे. ही सुरुवात करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली याचा आनंद आहे. आम्हाला आमचं आणि आमच्या व्यक्तिरेखेचं नाव लिहिलेल्या बाटल्या दशमी प्रोडक्शन कडून देण्यात आल्या आहेत. आमचा हा प्रयत्न इतरांनाही प्रेरणा देईल याची मला खात्री आहे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेमधून आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रत्यक्षातही चांगले बदल घडवण्यासाठी या मालिकेची संपूर्ण टीम सज्ज आहे. मालिकेत लवकरच रमा आणि भीवा यांचा विवाहसोहळाही पहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर… महामानवाची गौरवगाथा’ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Team Dr Babasaheb Ambedkar Bans PlasticTeam Dr Babasaheb Ambedkar Bans Plastic

Team Dr Babasaheb Ambedkar Bans Plastic
प्लास्टिक बंदी ! ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमचा स्तुत्य उपक्रम