‘सूर नवा ध्यास नवा’ – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे” लवकरच कलर्स मराठीवर!

Sur Nava Dhyas Nava Auditions

कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये २९ मेपासून रंगणार ऑडिशन्सची फेरी

संपूर्ण महाराष्ट्र ज्या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम परत येतोय… तो रंगमंच पुन्हा एकदा सज्ज झाला आहे महाराष्ट्रातील सूरवीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कारण, कलर्स मराठीवर गाण्याची मैफिल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांच्या जोडीने पुन्हा महाराष्ट्र अनुभवणार संगीताचा सुरेल नजराणा… आपला आवडता कार्यक्रम ‘सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे” लवकरच सुरू होत आहे. अजूनही प्रत्येक पर्वात सूरवीरांनी सादर केलेली गाणी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरातून या कार्यक्रमाला भरभरून प्रेम मिळाले आहे… म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या चार पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी पुन्हा घेऊन येत आहे ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे पाचवे पर्व. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास मे पासून सुरु होणार आहे. कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये २९ मे पासून ऑडिशन्सची फेरी रंगणार आहे. या करीता वयोगट असणार आहे १५ ते ३५. तुम्ही लवकरात लवकर रियाझ करायला सुरुवात करा कारण तुमचं सुरेल गाणं ऐकायला सगळेच आतुर आहेत. या ऑडिशनमधून निवडल्या जाणाऱ्या निवडक स्पर्धकांसोबत रंगणार आहे सुरांचं हे अद्वितीय पर्व.

या अनोख्या पर्वात सूरवीरांना मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे दोन लाडके परीक्षक अर्थात सुप्रसिध्द गायक, संगीतकार नि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे. संगीत क्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या या पर्वातून शोध घेतील, महाराष्ट्राच्या नव्या सुरांचा…. महाराष्ट्राच्या नव्या सूरवीराचा!! या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे सर्वांची लाडकी गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी. तर सज्ज व्हा, सुरांच्या या नव्या कोऱ्या सुमधूर मैफिलीसाठी… “सूर नवा ध्यास नवा- पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे”!!!

 

शहरांतील स्थळ आणि तारीख

 

२९ मे रविवार (पुणे) 

पी. जोग हायस्कूल, ५७, छत्रपती राजाराम महाराज पथ, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे – ४११०२९

वेळ : सकाळी ८ ते दु. ४ वा.

 

३१ मे मंगळवार (औरंगाबाद)

देवगिरी महाविद्यालय, न्यू उस्मानपुरा, औरंगाबाद – ४३१००५

वेळ : सकाळी ८ ते दु. ४ वा.

 

३ जून शुक्रवार (कोल्हापूर)

गायन समाज देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२

वेळ : सकाळी ८ ते दु. ४ वा.

 

५ जून रविवार (मुंबई) –  साने गुरुजी विद्यालय ,

भिकोबा पाठारे मार्ग, कॅटरिंग कॉलेज जवळ, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८

वेळ : सकाळी ८ ते दु. ४ वा.

 

Sur Nava Dhyas Nava Auditions Sur Nava Dhyas Nava Auditions