लष्करे कुटुंबात थाटामाटात साजरा होणार सिध्दीचा वाढदिवस !

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये बर्‍याच घटना बघायला मिळत आहे… आत्याबाईंनी शिवाशी धरलेला अबोला कायम आहे… तर मालिकेमध्ये चंपा नावाचे नवे पात्र आल्याने एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे असे दिसून येत आहे … चंपा आत्याबाईंची बहीण आहे असे तिने सगळ्यांना सांगितले आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी चंपाला माहिती आहेत… शिवा चंपाला आत्याबाईंच्या घरी घेऊन येतो तेंव्हा मात्र त्यांच्या तोंडचं पाणी पळतं… नक्की काय काय गुपितं हिला माहिती आहेत ? हिच्या येण्याने सिद्धी – शिवाच्या आयुष्यात कोणते नवे वादळ येणार ? हे कळेलच … हे सगळे घडत असतानाच शिवाच्या सोबतीने संपूर्ण कुटुंब सिद्धीला एक गोड सरप्राईझ देणार आहे… लष्करे कुटुंबात आपल्या लाडक्या सिद्धीचा वाढदिवस थाटामाटात साजरा होणार आहे…

शिवा चंपाला लष्करेंच्या जेंव्हा घरी आणतो तेंव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो ही बाई नक्की कोण आहे ? आणि तिचा आत्याबाईंशी नक्की काय संबंध आहे … पण जेंव्हा सिद्धी या विषयाच्या खोलात जाते तेंव्हा शिवा तिला बजावून सांगतो आत्याबाई ते बघून घेतील आपला याच्याशी काही एक संबंध नाही आहे… सिद्धी आणि मंगल या दोघींच्या मनात हाच प्रश्न आहे … सिद्धी या संदर्भात जलवाशी देखील बोलते… चंपाचे अचानक रुद्रायतमध्ये येण्याचे कारण काय आहे ? यामागे नक्की कोणतं गूढ आहे ? हे सिध्दीला कळेल ? चंपा आत्याबाईंकडून बोलता बोलता सगळं सत्य काढून घेते ज्यामध्ये तिला कळते सरकार आत्याबाईंचा मुलगा नाहीये… अजून पुढे मालिकेमध्ये काय होईल ? जाणून घेण्यासाठी बघत रहा जीव झाला येडापिसा रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…