एक तास भक्तीचा प्रवाह

Shree Gurudev Datta and Vithumauli
एक तास भक्तीचा प्रवाह... स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकांमधून मराठी परंपरा मराठी घरोघरी

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकांमधून मराठी परंपरा मराठी घरोघरी

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकांमधून प्रेक्षकांना तिन्हीसांजेला भक्तीचा प्रवाह अनुभवायला मिळतो आहे. लहानांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या पौराणिक मालिकांच्या भक्तीरसात न्हाऊन निघतोय. टेलिव्हिजन हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्यामुळे पौराणिक मालिकांच्या माध्यमातून मराठी परंपरा मराठी प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

दीड वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या ‘विठुमाऊली’’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतच आहे. भक्तीचा हाच प्रवाह ‘श्री गुरुदेव दत्त’ या नव्या मालिकेतून पुढे अखंड सुरु आहे. दत्तसंप्रदाय खूप मोठा आहे. अगदी श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थांपासून ते अगदी शंकर महाराजांपर्यंत. अवतार अनेक असले तरी मूळ मात्र एकच. त्याच मूळ अवताराची कथा म्हणजे ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका. श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. दत्तगुरुंच्या जन्माच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पण दत्तजन्म नेमका कसा झाला? याची रहस्यमय कथा ‘श्री गुरुदेव दत्त’च्या पुढील काही भागांमधून उलगडणार आहे. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट आणि अद्ययावत ग्राफिक्सच्या सहाय्याने दत्तजन्माचा अद्भूत सोहळा चित्रीत करण्यात आलाय. दत्तजन्माची कथा मालिकेमधून अनुभवायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी दिव्य अनुभूती असेल.

विठुमाऊली’ मालिकेत पुंडलिकाने विठ्ठलाच्या मंदिर उभारणीचं कार्य पूर्ण केलंय. आता वेळ आलीय ती कलीच्या विनाशाची. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठुराया कलीचा नाश करणार आहे. असत्यावर सत्याचा होणारा विजय विठुमाऊली मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.

सोमवार ते शनिवार भक्तीरसाने भारलेला हा एक तास पाहायला विसरु नका. नक्की पाहा विठुमाऊली सायंकाळी ७ वाजता आणि श्री गुरुदेव दत्त सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Shree Gurudev Datta and Vithumauli
एक तास भक्तीचा प्रवाह… स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकांमधून मराठी परंपरा मराठी घरोघरी