स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ नव्या वेळेत, रात्री ८ वाजता येणार भेटीला

Rang Maza Vegla New Timings

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ नव्या वेळेत म्हणजेच रात्री ८ वाजता येणार भेटीला, हर्षदा खानविलकर यांनी चाहत्यांना दिली खुषखबर

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. १३ जुलैपासून ही लोकप्रिय मालिका नव्या वेळेत म्हणजे रात्री ८ वाजता भेटीला येणार आहे. हर्षदा खानविलकर यांनी त्यांच्या वाढदिवशी स्टार प्रवाहच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन ही आनंदाची बातमी दिली. अत्यंत उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असे रंग माझा वेगळाचे एपिसोड्स १३ जुलैपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

PROMO:

 

या लोकप्रिय मालिकेत सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाल्या, आम्ही सर्वच कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहोत. रात्री ८ वाजता मालिकेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी येणार आहोत. माझ्या वाढदिवसाला स्टार प्रवाहच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन रंग माझा वेगळाच्या नव्या वेळेची खुषखबर देण्यात आली. त्यामुळे यंदाचा वाढदिवस माझ्या कायम स्मरणात राहिल. कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन मालिका थांबली होती. पण आता सर्व सुरळित होत आहे. त्यामुळे रंग माझा वेगळाच्या पुढील भागात खूप सारा ड्रामा पाहायला मिळणार आहे. तेव्हा १३ जुलैपासून रात्री ८ वाजता रंग माझा वेगळा पाहायला विसरु नका.

 

Rang Maza Vegla New Timings