“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” विशेष आठवडा…”
“वारी विश्वाची… भक्ती हरिनामाची”… परदेशात प्रथमच विठुनामाचा गजर होणार आहे. कलर्स मराठीवरील “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना हा सोहळा बघण्याची संधी मिळणार आहे. आंतराष्ट्रीय कीर्तन सोहळा नेपाळ येथे पार पाडला असून यामध्ये वारकरी बंधूनी अटकेपार झेंडा फडकवला असे म्हणायला हरकत नाही. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या कार्यक्रमाचा हा विशेष आठवडा नक्की बघा २२ जुलै पासून सोम ते शनि संध्या. ६.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर. महाराष्ट्रातील विविध भागातील प्रसिध्द कीर्तनकार पिढ्यान् पिढ्या त्यांच्या कीर्तनातून अजूनही या परंपरेचा वारसा जपत आहेत. इंदुरीकर महाराज, ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, ह.भ.प. श्री. इंगळे महाराज ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तन पोहचवले यांची कीर्तने ऐकण्याचा परमानंद प्रेक्षकांना “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या कार्यक्रमामधून मिळत आहे. याचसोबत महाराष्ट्राच्या विविध भागांमधील आताच्या पिढीतील कीर्तनकारदेखील कीर्तन सादर करत आहेत. याचसोबत प्रकाश महाराज साठे, अशोक महाराज इंगल, संग्रामबापू भंडारे पाटील, विशाल कोल्हे महाराज, अक्रूर साखरे महाराज यांचे कीर्तन प्रेक्षकांना ऐकायला मिळाले.
या विशेष आठवड्यामध्ये आंतराष्ट्रीय कीर्तन सोहळ्यामध्ये सहभाग असलेल्या महाराष्ट्रातील विविध भागातील १३ नामवंत कीर्तनकारांचे काकड भजन, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन आणि हरिपाठ ऐकण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ह.भ.प. अनिल महाराज तुपे, ह.भ.प. भरत महाराज जोगी, ह.भ.प. मधुकर महाराज शेलार, ह.भ.प. गोविंद महाराज मोरे इ… विश्वामध्ये आनंद, चैतन्य, बंधुता, शांती वृद्धींगत होऊन आत्मिक सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी विश्वशांती वैष्णव धर्म सोहळा आंतराष्ट्रीय कीर्तन महोत्सव प्रथमच नेपाळमध्ये आयोजित करण्यात आला ज्याचे प्रक्षेपण कलर्स मराठी वाहिनी करणार आहे.
तेंव्हा तुम्ही देखील सज्ज व्हा या कीर्तन सोहळ्यामध्ये सहभागी होऊन हरीनामाच्या गजरात तल्लीन होण्यासाठी आणि भक्तीमय अनुभव उपभोगण्यासाठी २२ जुलै पासून सोम ते शनि संध्या. ६.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.