एक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर

Chhatriwali Twist In Vikram-Madhuras Relationship
एक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर

नातं संपलंय, प्रेम नाही

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेत आलंय नवं वळण. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम – मधुरा मधलं नातं आता संपलंय. आपल्या वडिलांचा खून विक्रमच्या वडिलांनीच केलाय हे कटू सत्य मधुरा समोर उघड झाल्यानंतर मधुराने विक्रमपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. विक्रमने मधुराची माफी मागितली, तिला मनवण्याचा प्रयत्नही केला पण मधुरा मात्र तिच्या मतावर ठाम राहिली. मधुराच्या निर्णयाने खचलेला विक्रम आजही आपलं प्रेम विसरलेला नाही. नातं संपलं असलं तरी प्रेम नाही. आजही मधुरा परत येईल असा विश्वास त्याला वाटतोय. विक्रम – मधुराला पुन्हा एकत्र आणणारा क्षण मालिकेत येईल का याची उत्सुकता आहे.

खास बात म्हणजे विक्रमच्या बदललेल्या लूकला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंह सिनेमातल्या शाहिद कपूरच्या लूकशी मिळता-जुळता असा विक्रमचा लूक आहे. मधुराचं मन पुन्हा जिंकण्यात विक्रमला यश मिळणार का ? हे ‘छत्रीवाली’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘छत्रीवाली’ सोमवार ते गुरुवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Chhatriwali Twist In Vikram-Madhuras RelationshipChhatriwali Twist In Vikram-Madhuras RelationshipChhatriwali Twist In Vikram-Madhuras RelationshipChhatriwali Twist In Vikram-Madhuras RelationshipChhatriwali Twist In Vikram-Madhuras Relationship

Chhatriwali Twist In Vikram-Madhuras Relationship

Chhatriwali Twist In Vikram-Madhuras Relationship
एक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर