बिग बॉस मराठी सिझन २ – बिग बॉस मराठीच्या घरामधून माधव देवचके घराबाहेर…

Maadhav Deochake Eliminated Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठी सिझन २ - बिग बॉस मराठीच्या घरामधून माधव देवचके घराबाहेर...

बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डावमध्ये या आठवड्यामध्ये माधव आणि शिवानीची चांगलीच शाळा घेतली. नेहा, शिवानी आणि माधवमध्ये सुरु असलेल्या वाद, भांडण आणि खटके याबद्दल नेहाला महेश मांजरेकर यांनी सल्ला दिला. रुपाली सध्या घरामध्ये शिवानी म्हणेल तेच करते आणि ती म्हणेल तीच पूर्व दिशा असं सुरु आहे, रुपालीने शिवानीचे वकीलपत्र घेतले आहे असे वाटते… त्यावर रुपालीचे म्हणणे होते तसे नाहीये, महेश मांजरेकर यांनी सांगितले तुझ्या कृतीतून दाखव तेंव्हा विश्वास बसेल. तर शिवानीने हीनाच्या आईची माफी मागितली. घरात एक टास्क रंगला ज्यामध्ये घरात कोण कसे चुकत आहे, त्या सद्स्याबाबत काय वाटते याबद्दल सदस्यांना कानउघडणी करायची होती. ज्यामध्ये आरोहने शिवची, हीनाने शिवानीची, नेहाने माधवची, किशोरी यांनी रुपालीची तर शिवानीने वीणाची कानउघडणी केली. प्रत्येक आठवड्यामध्ये एका सदस्याला घराबाहेर जाणे अनिवार्य आहे. या आठवड्यामध्ये माधव, हीना, वीणा, नेहा, किशोरी हे सदस्य नॉमिनेट होते… माधव आणि किशोरी डेंजर झोनमध्ये आले आणि माधवला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडावे लागले. शिवानी, हीना आणि नेहाच्या खूप जवळचा मित्र घरामधून बाहेर पडला आणि त्यामुळे या तिघींना अश्रू अनावर झाले… माधवच्या बाहेर जाण्याने नेहा आणि शिवानीला खूप मोठा धक्का बसला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर माधवला आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली… “माणूस म्हणून या घरामध्ये खूप छान होतास” तर माधव कधीच डर्टी गेम खेळला नाही, कधी जास्त दुसऱ्या सदस्यांबाबत बोलला नाही असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.  माधवला एक विशेष अधिकार दिला, त्याला कोणत्याही एका सदस्याला सेफ करायचे होते आणि त्याने नेहाला सेफ केले.

WEEKEND चा डावमध्ये घरामध्ये एक टास्क खेळण्यात आला ज्यामध्ये सदस्यांनी एकमेकांसोबत डान्स सादर केला. अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे यांनी मेंदीच्या पानावर या गाण्यावर डान्स केला… आ देखे जरा या गाण्यावर शिवानी आणि वीणा, शिव आणि हीनाने तुझ्या प्रीतीचा या गाण्यावर डान्स केला. ज्यामुळे घरामध्ये जरा हलकं फुलकं वातावरण तयार झाले. ज्योती सूर्यवंशी यांनी शिवानीला वूट आरोपी म्हणून घोषित केले. त्यांनी शिवानीला आगळीवेगळी सजा दिली, तिला हिब्रू भाषेमध्ये गाणे म्हणायला सांगितले… पण शिवानीने हीनाच्या मदतीने गुजराती भाषेमध्ये गाणे म्हंटले. तर चुगली बूथमध्ये शिवानीला चाहत्याने माधव बद्दल चुगली केली… तर या टास्कमध्ये वीणावर महेश मांजरेकर खूप चिडले… मला ऐटीट्युड आवडत नाही असे त्यांनी वीणाला खडसावले.

बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

 

Maadhav Deochake Eliminated Bigg Boss Marathi 2Maadhav Deochake Eliminated Bigg Boss Marathi 2

Maadhav Deochake Eliminated Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठी सिझन २ – बिग बॉस मराठीच्या घरामधून माधव देवचके घराबाहेर…