‘हिरकणी’ मध्ये ९ कलाकार आणि ६ लोककलांच्या मदतीने सादर करण्यात आले अनोखे ‘शिवराज्याभिषेक गीत’

शिवराज्याभिषेक म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण…  हिरकणी सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात ९ कलाकार ६ लोककला सादर करताना दिसतात. ते ९ कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ चांदेकर, प्रियदर्शन जाधव, हेमंत ढोमे, पुष्कर श्रोत्री, क्षिती जोग, सुहास जोशी आणि संगीतकार राहुल रानडे. कविभूषण, संदीप खरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत तर अमितराज यांनी संगीत दिले आहे. नीलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दिपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव चाटी आणि संतोष बोटे यांनी हे गाणे गायले आहे.

राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत तर सिनेमाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे.  इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल निर्मित आणि लॉरेन्स डिसुझा सहनिर्मित हिरकणी’ सिनेमा येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Hirkani Shivrajyabhishek SongHirkani Shivrajyabhishek SongHirkani Shivrajyabhishek SongHirkani Shivrajyabhishek SongHirkani Shivrajyabhishek SongHirkani Shivrajyabhishek Song

Hirkani Shivrajyabhishek Song
‘हिरकणी’ मध्ये ९ कलाकार आणि ६ लोककलेच्या मदतीने सादर करण्यात आले अनोखे ‘शिवराज्याभिषेक गीत’