सोनी मराठी वाहिनीवर सुरू होते नवीन मालिका – ‘तुमची मुलगी काय करते?’

Tumchi Mulgi Kay Karte
Tumchi Mulgi Kay Karte

सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘तुमची मुलगी काय करते?’ ही नवीन मालिका सुरू होते आहे. नुकतच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अभिनेत्री मधुरा वेलणकर मुख्य नायिकेच्या भुमिकेत दिसणार आहे. अभिनेता हरीश दुधाडे पोलिस इन्स्पेक्टर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मालिकेची निर्माती मनवा नाईक असून संवाद मुग्धा गोडबोले तर कथा – पटकथा लेखन चिन्मय मांडलेकर करणार आहे. लवकरच प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर एक थरारक मालिका बघायला मिळणार आहे. मालिकेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहात राहा, सोनी मराठी !

 

 

Tumchi Mulgi Kay Karte