दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या सेटवर पोहोचला चिमुकला चाहता

Dakhkhancha Raja Jyotiba Fan Love

स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. थोरामोठ्यांसोबतच लहानग्यांना देखिल ही मालिका आवडते आहे. याचीच पोचपावती देणारा एक प्रसंग नुकताच घडला. ज्योतिबावर भरभरुन प्रेम करणारा एक चिमुकला चाहता नुकताच सेटवर पोहोचला. विशेष बाब म्हणजे ज्योतिबासारखीच वेशभुषा करत त्याने या सेटवर हजेरी लावली होती. या चिमुकल्या चाहत्याला भेटून सेटवर सगळेच जण भारावून गेले होते.

या छोट्या चाहत्याला भेटून ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचा आनंदही गगनात मावत नव्हता, ‘अश्या चाहत्यांमुळेच काम करायला नवी ऊर्जा मिळते. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका लहान मुलांनाही आवडते आहे याचा आनंद आहे. सेटवर पोहोचलेल्या या चिमुकल्याला तर मालिकेचं संपूर्ण शीर्षकगीत पाठ होतं आणि ते त्याने आम्हा सर्वांसमोर सादर केलं. प्रेक्षकांचं हे प्रेम असंच राहो अशी भावना विशालने व्यक्त केली.’

तेव्हा न चुकता पाहा दख्खनचा राजा ज्योतिबा नव्या वेळेत म्हणजेच सायंकाळी ६ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Dakhkhancha Raja Jyotiba Fan Love Dakhkhancha Raja Jyotiba Fan Love