बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज टिकेल तोच टिकेल हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीम मध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन ठेवले आहे, बजर वाजल्यानंतर टीममधील सदस्य सिंहासनावर मुद्रा हातात घेऊन बसेल… त्याच्यासोबत टीम मधील एक सदस्य त्याच्या संरक्षणासाठी असेल… दुसऱ्या टीम मधील सदस्याने बजर वाजण्याच्या आत मुद्रा धरून बसलेल्या सदस्याला लवकरात लवकर सिंहासनावरून हटवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सदस्य हा त्रास सहन करू शकतील ? कोणता सदस्य अधिक वेळ सिंहासनावर टिकून राहील ? हे बघणे रंजक असणार आहे.
“हिशोब पाप पुण्याचा” – नॉमिनेशन कार्य :
बिग बॉस मराठीच्या घरात काल “हिशोब पाप पुण्याचा” हे नॉमिनेशन कार्य पार पडले… या कार्यात इतर सदस्यांना स्वर्गात पाठवून सेफ करायचं कि नर्कात पाठवून नॉमिनेट करायचे याचा निर्णय कार्यप्रमुख शिव ठाकरे आणि त्यांचे दोन सल्लागार माधव, नेहाला करायचे होते …. परंतु अंतिम निर्णय हा कार्यप्रमुखचाच असेल… कालच्या टास्क मध्ये रुपाली – वैशाली, अभिजीत केळकर – पराग, हीना – वीणा यांच्यामध्ये बरेच वाद झाले… तर टास्क दरम्यान सुरेखाताई – वीणा मध्ये देखील भांडण झाले… कालच्या टास्कमध्ये वीणा जगताप, पराग कान्हेरे, हीना पांचाळ, किशोरी शहाणे आणि रुपाली भोसले घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले.
कोणती टीम टिकेल तोच टिकेल हे कार्य जिंकेल ? या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर पडेल ? प्रेक्षकांची मते कोणाला वाचवतील ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.