बिग बॉस मराठी’च्या घरात आर्या, निक्की अन् जान्हवीचा कल्ला; कोण शांत करणार तिघींना?

बिग बॉस मराठी दिवस सव्विसावा : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन धमाका करत आहे. या सीझनमधील सर्वच कल्लाकार प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. आजच्या भागात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आर्या, निक्की आणि जान्हवीचा कल्ला होताना दिसून येणार आहे. आता या तिघींना कोण शांत करणार हे पाहावे लागेल.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी म्हणत आहे,”बिग बॉस’ मी स्वत:ला सांभाळू शकत नाही”. पुढे आर्याला निक्की म्हणते,”माझ्या पांघरुनला हात लावायचा नाही”. आर्या म्हणते,”दम असेल तर मला फोडून दाखव”. तिघींमध्ये नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा भाग पाहावा लागेल.

निक्की बदलली असल्याचा अरबाजला संशय

‘बिग बॉस मराठी’च्या घराची निक्की आता कॅप्टन झाली आहे. कॅप्टन झाल्यानंतर निक्की बदलली असल्याचा अरबाजला आणि जान्हवीला संशय आला आहे. याबद्दल आजच्या भागात अरबाज, निक्की आणि घन:श्याममध्ये आजच्या भागात चर्चा होणार आहे.

BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर.