बिग बॉस मराठी सिझन २ – कोण बनणार घराचा नवा कॅप्टन रुपाली कि अभिजीत ?

Bigg Boss Marathi 2 Captaincy Task
कोण बनणार घराचा नवा कॅप्टन रुपाली कि अभिजीत ?

बिग बॉस मराठीच्या घरातील नाती आता सातव्या आठवड्यामध्ये बरीच बदलताना दिसत आहेत… घरातील जी सदस्य एकमेकांच्या पाठीमागे त्यांना नाव ठेवत होती, त्यांच्याबद्दल बरच काही वाईट बोलत होते, ज्यांना घरातून कसे बाहेर काढता येईल याबद्दल प्लॅनिंग करत होते… तेच आता एकमेकांशी बोलताना, मज्जा मस्ती करताना दिसत आहेत… काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉसकडून खूप मोठी शिक्षा मिळाली, ज्यामध्ये सदस्यांना बिग बॉसनी कठोर शब्दांमध्ये खडसावले… कारण इतके दिवस होऊन देखील सदस्य घरातील महत्वाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसले आणि रोजच करतात… आता बिग बॉसनी काल जप्त केलेल्या वस्तू सदस्य कसे परत मिळवणार हे लवकरच कळेल…

अतिथी देवो भव: या टास्कमध्ये टीम A आणि टीम B मधील सदस्यांनी उत्तम कामगिरी केली आणि दोन्ही टीममधील एका सदस्याला कॅप्टन होण्याची संधी मिळणार आहे. आणि त्यासाठी कॅप्टन्सीची उमेदवारी कुठल्या दोन सदस्यांना द्यावी हे टीमने सर्वानुमते ठरवायचे आहे असे बिग बॉसनी सदस्यांना सांगितले… तर रुपाली आणि अभिजीत केळकर ही दोन नावे पुढे आली आणि यांच्यामध्येच आज कॅप्टन्सीचे कार्य रंगणार आहे. या टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान कोण पटकावणार रुपाली कि अभिजीत ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

रुपाली आणि अभिजीतमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे… या कार्यामध्ये विरुध्द टीमच्या उमेदवाराला फोन ठेवण्यास भाग पाडायचे आहे… या टास्कमध्ये वैशालीने रुपालीला विचारले “तुला तरी वाटत का तू कॅप्टन होण्याच्या लायकीची आहेस ? तू टास्क जिंकण्यासाठी तुझ्या भावाला वापरलस… रूपालीला हे ऐकून धक्का बसला आणि जमिनींवर कोसळली… नेहा तिच्या मदतीला धावून गेली… आता पुढे काय होईल ? रुपाली आणि अभिजीतला फोन ठेवण्यासाठी भाग पाडायला सदस्य काय काय ऐकवतील ? आणि कोणता सदस्य बाजी मारेल ? हे बघणे रंजक असणार आहे…

 

Bigg Boss Marathi 2 Captaincy TaskBigg Boss Marathi 2 Captaincy Task

Bigg Boss Marathi 2 Captaincy Task
कोण बनणार घराचा नवा कॅप्टन रुपाली कि अभिजीत ?