अनिल कपूर बिग बॉस ओटीटी सीझन 3 करणार होस्ट !

अनिल कपूर बिग बॉस OTT 3 चे होस्ट झाल्याची घोषणा नुकतीच Jio Cinema ने केली आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना विशेषतः Jio Cinema Premium वर पाहता येणार आहे. या घोषणे नंतर प्रेक्षकांमध्ये शो बद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विविध भूमिका साकारण्यापासून, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडण्यापासून ते पाथब्रेकिंग चित्रपटांची निर्मिती करण्यापर्यंत अभिनेते अनिल कपूर कायम चर्चेत असतात. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अनिल कपूरने यांनी कायमच दर्जेदार काम केले आहे.

Anil Kapoor

किंबहुना मेगास्टारच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकल्यास अनिल कपूर अपारंपरिक आणि व्यावसायिक भूमिकांमध्ये कसे अफलातून कलाकार आहेत हे लक्षात येते.

आता अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी’ च्या आगामी सीझनचे होस्ट झाले असून त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस OTT वर तिसऱ्या सीझनसाठी परत येत असून अनिल कपूर होस्टच्या नवीन भूमिकेत दिसणार आहेत जे त्यांनी यापूर्वी कधीही केले नव्हते.

होस्ट म्हणून अनिल कपूरची पहिली झलक इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना या बद्दल उत्सुकता आहे. अनिल कपूर यांनी या आधी त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सना त्यांच्या होस्टिंग डेब्यू बद्दल एक हिंट दिली होती. त्यांच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांनी लिहिले “सुना है बिग बॉस ओटीटी 3 का होस्ट बडा गुड लुकिंग है”. खरं तर निर्मात्यांनी शोची एक झलक देखील शेअर केली जी अनिल कपूरच्या होस्टिंग शैलीची एक परिपूर्ण झलक होती.

Anil Kapoor
अनिल कपूर यांच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे आणि आता ते ‘बिग बॉस OTT 3’ वर आपली छाप कशी सोडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा शो लवकरच जिओ सिनेमा प्रीमियम वर येणार आहे.

कामाच्या आघाडीवर ‘बिग बॉस ओटीटी’च्या पलीकडे अनिल कपूर यांच्याकडे सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याचीही अफवा आहे.

Anil Kapoor Bigg Boss OTT 3