*बिग बॉस मराठी दिवस एकतिसावा*
*Bigg Boss Marathi New Season Day 31*: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक महिना पूर्ण होताच सदस्यांमध्ये नातेसंबंधांमध्ये बदल जाणवू लागले आहेत. कालच्या भागात बिग बॉसने घरातील सदस्यांना जोड्यांच्या रूपात एकत्र केलं आहे, आणि निक्की व अभिजीतची जोडी बनवली आहे. या नवीन समीकरणामुळे त्यांची मैत्री तुटणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, या मैत्रीने अरबाजच्या भावना दुखावल्या आहेत.
बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत पोळी बनवत असताना दाखवले आहे. निक्कीच्या हास्यामुळे अरबाज संतापतो आणि “हसत आहेस” असं म्हणत भांडी फोडायला सुरुवात करतो. यावर निक्की उत्तर देते, “काय आहे याचा बालीशपणा. तुला माझी गरज नाही आहे”. अरबाज तिला उत्तर देतो, “नाही आहे… आणि आता हे पाहून तर अजिबातच नाही”. निक्की त्याला स्पष्टपणे बोलायला सांगते, ज्यामुळे अरबाज आणखी चिडतो.
निक्की आणि अभिजीतची वाढती मैत्री अरबाजला सहन होत नाही, त्यामुळे त्याचा राग आजच्या भागात भांडी फोडून, सामान आपटून व्यक्त करताना दिसणार आहे. घरातील इतर सदस्य त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतील, पण अरबाजचा संताप शमणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
*‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर*