बाळूमामा आणि सत्यवा पंढरपुर वारीतील वारकऱ्यांच्या भेटीला

Balumama and Satyava Meets Waarkaris
बाळूमामा आणि सत्यवा पंढरपुर वारीतील वारकऱ्यांच्या भेटीला

“बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेतील बाळूमामा आणि सत्यवा – सुमित पुसावळे आणि कोमल मोरे पंढरपुर वारीतील वारकऱ्यांच्या भेटीला

सगळीकडे वारीचा सोहळा अत्यंत उत्साह आणि आनंदात साजरा झाला… पंढरपुरच्या वारीत सहभागी वारकरी आणि जनसमुदायाच्या भेटीला बाळूमामा आणि सत्यवा अर्थातच मालिकेतील कलाकार सुमित पुसावळे आणि कोमल मोरे गेले होते.

कलर्स मराठीवरील  संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” हि मालिका तुफान गाजतेय. बाळूमामा आणि त्यांची आई हे विठ्ठल भक्त होते, हाच धागा पकडून वारीच औचित्य साधून या मालिकेतील कलाकार वारकऱ्यांच्या भेटीला गेले.  कलर्स मराठी आयोजित ‘गजर विठुरायाचा सोहळा भक्तीचा’ या उपक्रमा अंतर्गत वारकऱ्यांना आणि तेथे जमलेल्या भक्तांना सुमित पुसावळे आणि कोमल मोरे यांना भेटण्याची संधी मिळाली.

या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली आणि अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला. बाळूमामांच्या प्रपंचाचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडणार आहे. दिनदुबळ्यांचा कैवार घेणारे, गरीबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे थोर संत म्हणजे संत बाळूमामा.

पंढरपुरच्या या वारीत टाळ आणि मृदुंग, अभंग, वारीतील विविध खेळ, असा भक्तीमय सोहळा असतो. पंढरपुरची वारी करावयाची म्हणजे पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून घरी परतायचे. वारीची हि प्रथा फार जुनी आहे. विठुरायाचे भक्त पंधरा ते वीस दिवस पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनास येतात. संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. याच निमित्ताने सुमित पुसावळे आणि सत्यवा या वारकऱ्यांच्या भेटीस गेले. यामुळे वारीचे वातावरण अधिकच भक्तीमय झाले.

 

Balumama and Satyava Meets WaarkarisBalumama and Satyava Meets WaarkarisBalumama and Satyava Meets WaarkarisBalumama and Satyava Meets WaarkarisBalumama and Satyava Meets Waarkaris

Balumama and Satyava Meets Waarkaris
बाळूमामा आणि सत्यवा पंढरपुर वारीतील वारकऱ्यांच्या भेटीला