‘वुमन्स डे’ स्पेशल: “एकमेकांशी तुलना न करता, स्वत:चं कौतुक करुन स्वत:चा आदर करा”: अभिनेत्री रीना मधुकर
एक स्त्री ही दुसऱ्यासाठी प्रेरणा देणारी असावी हे जितकं योग्य आहे तितकंच किंवा त्याहून जास्त हे पण महत्त्वाचं आहे की प्रत्येक स्त्रीने स्वत:चं कौतुक स्वत: करायला हवं. स्वत:कडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक ठेवायला हवी. स्वत:ची दुस-याशी तुलना करुन आपणच आपलं नुकसान करत असतो. देवाने प्रत्येकाला विशेष बनवलं आहे. ‘मला तिच्याहून सुंदर का नाही बनवलं’ किंवा ‘तिला जे जमतं ते मला का नाही जमत’ अशा छोट्या मोठ्या तक्रारी करुन आपण स्वत:च स्वत:ला कमी लेखत असतो… आणि हिच सवय मोडण्यासाठी ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने अभिनेत्री रीना मधुकरने ट्विटरच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर पण अर्थपूर्ण असा संदेश दिला आहे ज्यात तिने म्हटलंय की, #LiveHappyWithSelf म्हणजेच तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला स्विकारुन स्वत:वर प्रेम करा. आयुष्य सुंदर आहेच पण ते आणखी सुंदर बनू शकतं जर आपण आपलं असणं, दिसणं थोडक्यात काय तर आपलं अस्तित्व सेलिब्रेट केलं, त्याचा आदर केला तर.
‘वुमन्स डे’ च्या निमित्ताने रीनाने जगातल्या सर्व स्त्रियांना शुभेच्छा देण्यासाठी केलेलं ट्वीट तुम्हांला नक्कीच आवडेल…
YOU ARE WHO YOU ARE! 'मी अशीच का, मी तशी का नाही', या तक्रारी न करता स्वत:चं असणं सेलिब्रेट करा.दुस-यांशी तुलना करणं सोप्पं पण स्वत:चं कौतुक करणं कठीण झालंय का? माझं म्हणणं इतकंच की #LiveHappyWithSelf
तुमच्या सारखं जगात दुसरं कोणीच नाही #YouAreSpecial #HappyWomensDay2022 pic.twitter.com/yeO3aLHUO8— Reena Madhukar (@ReenaMeraNaaam) March 8, 2022