स्टार प्रवाह परिवारात गणरायाचं धुमधडाक्यात स्वागत

Star Pravah Ganeshotsav

गणपती बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. अवघ्या काही दिवसांत संपूर्ण वातावरण भक्तीमय होईल, आणि गणेशोत्सवाची उर्जा प्रत्येक मनाला नवचैतन्य देऊन जाईल. या आनंदोत्सवात स्टार प्रवाह वाहिनीचा संपूर्ण परिवार सहभागी होणार आहे, ज्यांनी मराठी परंपरांचे जतन करत आपले ब्रीदवाक्य ‘मराठी परंपरा मराठी प्रवाह’ खऱ्या अर्थाने सिद्ध केले आहे.

Star Pravah Ganeshotsav

स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४: अनोख्या गोष्टींचा खजिना

यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव विशेष असणार आहे कारण स्टार प्रवाह परिवार ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ या कार्यक्रमातून बाप्पाच्या अनसुया, अविस्मरणीय आणि कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा खजिना उलगडणार आहे. नृत्यनाटिकेच्या रुपात या गोष्टी प्रेक्षकांसमोर येणार आहेत, ज्यात १०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या कलेच्या माध्यमातून गणरायाच्या उत्सवाला एका नवीन उंचीवर नेण्यात येणार आहे.

Star Pravah Ganeshotsav

तेजस्वी सूत्रसंचालन आणि रंगतदार सादरीकरण

या विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील मानसी आणि तेजस, म्हणजेच समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे, यांनी सांभाळली आहे. त्यांच्या जोडीला सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्या खुमासदार सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली आहे. त्याचप्रमाणे, स्टार प्रवाहचा धिंगाणेबाज कलाकार सिद्धार्थ जाधव देखील आपल्या जल्लोषी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

स्टार प्रवाह गणेशोत्सव

रविवारच्या सायंकाळी विसरू नका!

तुम्हाला हा अनोखा गणेशोत्सव अनुभवायचा असल्यास, रविवार १ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ हा विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका. स्टार प्रवाह परिवाराने सादर केलेला हा उत्सव नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भावणार आहे.स्टार प्रवाह गणेशोत्सव