‘रंग माझा वेगळा’ मालिकेत अभिज्ञा भावेची एंट्री

Abhidnya Bhave To Enter Rang Maza Vegla
Abhidnya Bhave To Enter Rang Maza Vegla

Click here to read this article in English.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एंट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. कार्तिक आणि तनुजा कॉलेज फ्रेण्ड्स. मात्र कॉलेजनंतर या दोघांची भेट कधी झाली नाही. आता मात्र एका अपघातानेच या दोघांची भेट घडवून आणली आहे. तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पहाणं देखिल उत्सुकतेचं असणार आहे.

एकीकडे सौंदर्या काळ्या रंगाचा द्वेष का करते या गोष्टीचा छडा लावण्यासाठी दीपा कार्तिक जीवाचं रान करत आहेत. अश्यातच तनुजाच्या येण्याने हा गुंता वाढणार की सुटणार या प्रश्नांची उत्तरं रंग माझा वेगळाच्या पुढील भागांमधून लवकरच उलगडतील त्यासाठी न चुकता पाहा ‘रंग माझा वेगळा’ दररोज रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Abhidnya Bhave To Enter Rang Maza Vegla
Abhidnya Bhave To Enter Rang Maza Vegla