कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेचे ५० भाग पूर्ण !

Jeev Zala Yedapisa
कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेचे ५० भाग पूर्ण !

कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली… मग ती कथा असो, रिअल लोकेशन्स असो वा मालिकेतील पात्र असो… गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळ देसाई, सिद्धी म्हणजेच विदुला चौघुले यांनी त्यांच्या पहिल्याच मालिकेमध्ये प्रेक्षकांना आपलेसे केले तसेच आत्याबाई म्हणजेच चिन्मयी सुमित, शिवाच्या वडिलांची भूमिका साकारणारे मोहन जोशी, नरपत चिकणे म्हणजेच रोहित कोकाटे यांच्या भूमिकांना सगळ्यांचीच पसंती मिळत आहे…मालिका सुरु झाल्यापसून अनेक घटना मालिकेमध्ये घडल्या शिवा – सिद्धीमध्ये असलेले गैरसमज, त्यांचे मतभेद नंतर त्यांचे लग्न होणे, लग्नानंतर ज्योतीबा दर्शन, शिवा सिद्धीचे  हनिमूनला जाणे. आता नुकतेच मालिकेने ५० भाग पूर्ण केले…

 

आता मालिका कोणत्या रंजक वळणावर पोहचणार याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. आणि मालिकेमधील कलाकरांनी सेल्फी आणि केक कटिंग करून आनंद साजरा केला… तेंव्हा मालिकेमध्ये पुढे काय होते ते नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनी रात्री ८ वा.

Jeev Zala Yedapisa
कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेचे ५० भाग पूर्ण !
Jeev Zala Yedapisa
कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेचे ५० भाग पूर्ण !