वायाकॉम१८ आणि सीएमसीए सहयोगाने मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम राबवणार

Viacom18 Beach Cleaning Activity
  • पर्यावरणास-अनुकूल उत्‍सव साजरा करण्‍याबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी निकटून्‍स शिवा व रूद्रा मुंबईतील ६०० हून अधिक विद्यार्थ्‍यांमध्‍ये झाले सामील
  • गणपती विसर्जनानंतर मुंबईच्‍या प्रसिद्ध समुद्रकिना-यांवर राबवण्‍यात येणा-या स्‍वच्‍छता मोहिमेला १० शाळांमधील विद्यार्थ्‍यांचा हातभार

मुंबई, १३ सप्‍टेंबर २०१९: मुंबई शहर आणि मुंबईकरांसाठी १० दिवस चालणारा गणेशोत्‍सव एक आकर्षण आहे. पण विसर्जनानंतर (मूर्तींचे विसर्जन) शहरातील समुद्रकिना-यांवरील दृश्‍य अत्‍यंत दयनीय असते. समुद्रकिनाऱ्यांवर पीओपीच्‍या मूर्ती आणि प्‍लास्टिक कचरा पसरलेला असतो. शहरातील नागरिकांच्‍या प्रयत्‍नांना पाठिंबा देण्‍यासह या समस्‍येबाबत जागरूकता निर्माण करण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये व्‍हायकॉम१८ ने सलग ४थ्‍या वर्षी शहरातील समुद्रकिनाऱ्यांवर स्‍वच्‍छता मोहिम राबवण्‍यासाठी चिल्‍ड्रेन मूव्‍हमेंट फॉर सिव्हिक अवेअरनेससोबत (सीएमसीए) सहयोग जोडला आहे. निकटून शिवा व रूद्रासह ६०० हून अधिक मुलांनी जागरूकता निर्माण करत लोकांना पर्यावरणास अनुकूल पद्धतीने उत्‍सव साजरे करण्‍याकरिता प्रोत्‍साहित केले.

त्‍यांच्‍या चकाचक मुंबई उपक्रमाचा भाग म्‍हणून सीएमसीएसह मीडिया आणि मनोरंजन नेटवर्कने जुहू, अक्‍सा आणि गिरगाव चौपटी येथील समुद्रकिनाऱ्यांवर स्‍वच्‍छता मोहिम राबवली. वर्षानुवर्षे अधिकाधिक विद्यार्थ्‍यांनी पुढाकार घेत या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

 

Viacom18 Beach Cleaning ActivityViacom18 Beach Cleaning ActivityViacom18 Beach Cleaning ActivityViacom18 Beach Cleaning Activity