कलर्स मराठीवरील श्री लक्ष्मीनारायण मालिकेमध्ये प्रेक्षकांना लवकरच समुद्रमंथन बघायला मिळणार आहे… समुद्रमंथनाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. या आधी अनेक वेळा आपण समुद्रमंथन पाहिले आहे.. परंतु पहिल्यांदाच समुद्रमंथनाच्या दृष्टीकोनातून विष्णू लक्ष्मीची भेट कशी घडली हे पाहायला मिळणार आहे… समुद्रमंथनातून लक्ष्मी समुद्रलोकाच्या बाहेर येणार आणि अखेर लक्ष्मी विष्णूची भेट होउन त्यांचा विवाह संपन्न व्हावे यासाठी समुद्र मंथनाचे प्रयोजन करण्यात येते. परंतु समुद्र मंथनामुळे समुद्र ढवळून निघेल, तसाच समुद्रातल्या जीवांच्या रक्षणासाठी लक्ष्मीच समुद्रमंथनाला नकार देते.. लक्ष्मीचं हे मत बदलण्यासाठी अखेर विष्णूच प्रयत्न करतात.. यासाठी विष्णू साधूचे रूप धारण करून समुद्रालोकात येतात… लक्ष्मीचं मन वळवण्यासाठी विष्णू अनेक प्रयत्न करतात… याचवेळी लक्ष्मी मात्र साधू रूपातल्या विष्णूकडे आकर्षिली जाते… विष्णू लक्ष्मीचं मन कस वळवणार ? लक्ष्मी समुद्रमंथनाला होकार देणार का ? अलक्ष्मीला विष्णू कसे टाळू शकतील ? हे समुद्रमंथन घडणार का ? हे बघणे रंजक असणार आहे… तेंव्हा नक्की बघा श्री लक्ष्मीनारायण सोम ते शनि संध्या. ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.