गावासमोर शिवा मागणार सिद्धीची माफी…

शिवा आणि सिद्धीचे नाते एका नाजूक वळणावर येऊन पोहचले आहे. खूप अडचणींना सामोरे जात दोघे एकाच घरात रहाण्याचा प्रयत्न करत आहेत… आणि या सगळ्यामध्ये सिद्धीला भक्कम साथ आहे ती म्हणजे यशवंत, सोनी आणि काकूची…  शिवाकडून होणाऱ्या चुका, कधी कधी त्याचं चांगलं वागण, तिच्या बाजूने बोलणे, घरच्यांची मदत करणे, वा स्वत:च्या आईला सिद्धीच्या आई वडिलांची माफी मागायला लावणे… हे सगळे सिद्धीला कधी कधी संभ्रमात पाडते, नक्की शिवा चांगला आहे कि वाईट ? शिवा आणि सिद्धीचे सत्य नारायणाच्या पुजेस जोडीने बसणे त्यांच्या नव्या नात्याची सुरुवात आहे का असे वाटत असतानाच सिद्धीसमोर शिवाचे एक सत्य आले. काही दिवसांपूर्वी सिद्धीच्या वडिलांना अटक झाली आणि त्यांना पोलीस घेऊन गेले… आणि यामागचे कारण सागरने सिद्धीला सांगितले आणि हे जे काय घडले त्यामागे शिवाचा हात आहे, याला तोच कारणीभूत आहे असे तो म्हणाला. हे ऐकल्यावर सिद्धी कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेली आहे… सिद्धी रुद्रायत देवळात असताना तिथे शिवा तिला घेऊन जाण्यास येतो पण ती त्याच्यासोबत जाण्यास साफ नकार देते. घरामध्ये सगळेच काळजीत आहेत तुम्ही याव अस सांगून देखील सिद्धी तिच्या मतावर ठाम आहे हे बघून शिवा तिथून निघून जातो…

आता हे सगळ घडत असताना शिवा सारखा मुलगा जो आत्याबाई आणि त्याच्या वडिलांखेरीज कोणासमोर झुकत नाही, ना कधी कोणाची तमा बाळगतो… सिद्धी आणि शिवा एकमेकांचा दुस्वास करतात आणि त्यांच्यामध्ये कधीच नवरा बायकोचं नात तयार होऊ शकत नाही याची कल्पना दोघांनाही असताना, येत्या भागामध्ये शिवा सिद्धीची माफी मागताना दिसणार आहे… शिवाच्या या वागण्यामुळे सिद्धीला धक्का बसला आहे आणि शिवाच्या अशा वागण्यामागचे कारण तिला कळत नाहीये… आता त्याने ही माफी संपूर्ण गावासमोर अशाप्रकारे का मागितली ? हे प्रेक्षकांना २ आणि ३ जुलैच्या भागामध्ये कळणार आहे.

तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Shiva Apologizes To SiddhiShiva Apologizes To SiddhiShiva Apologizes To Siddhi