‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेपासून चित्रीकरणाचा श्रीगणेशा !

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेपासून चित्रीकरणाचा श्रीगणेशा !

‘इतक्या दिवसाने कॉल टाईमचा मेसेज बघून आनंद झाला’ – शिवानी सोनार

कोरोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास तीन महीने सर्व काही ठप्प झाले होते. पण आता मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे. राजा रानीची गं जोडी मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली मग ती कथा असो, रिअल लोकेशन्स असो वा मालिकेतील पात्र असो. प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिले आणि आता लवकरच मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले, शिवानी सोनार, मनीराज पवार, श्रुती अत्रे, गार्गी फुले आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीत मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

मालिकेतील कलाकार दिवसातील जास्तीत जास्त वेळ सेटवरच असतात. आणि म्हणूनच सेट म्हणजे कलाकारांसाठी जणू दुसरं घरच असतं. मालिकेच्या संपूर्ण टिमशी घरोब्याचे संबंध तयार होतात. त्यामुळे सेटवरील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मंडळी तीन महिन्यांनंतर झालेल्या भेटीनंतर थोडे भाऊक झाले पण त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साहदेखील होता. चित्रीकरण सुरू झाले असून मालिकेची टिम आता सज्ज झाली आहे प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी ! शूटिंग दरम्यान मास्क घालून वावरणे अनिवार्य असणार आहे, याचसोबत आवश्यक तितक्याच क्रू मेंबर्सच्या उपस्थितीत चित्रीकरण पार पडणार आहे.

इतक्या दिवसानंतर कॉल टाईमचा मॅसेज बघून मला खूप आनंद झाला… मी स्वत: उत्सुक आहे पुन्हा एकदा संजुला भेटण्यासाठी तर प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा अंदाज मी लावूच शकते… आम्ही सगळेच आतुर आहोत प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी… आम्हाला खात्री आहे आमच्यावरचे तुमचे प्रेम असेच कायम राहील– आपली लाडकी संजु म्हणजेच शिवानी सोनारने अशा प्रकारे आपला आनंद व्यक्त केला.

नव्या भागांसोबत आम्ही येत आहोत तुमच्या भेटीला २१ जुलै पासून संध्या ७.०० वा. पासून कलर्स मराठीवर !

 

Raja Ranichi Ga Jodi Shoot Resumes

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेपासून चित्रीकरणाचा श्रीगणेशा !