‘हॉटस्टार’ वर ‘जिवलगा’ मालिका ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय

अल्पावधीतच लोकप्रिय ठरत असलेल्या जिवलगा या मालिकेला सोशल मीडियावरही तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. हॉटस्टारवर ही मालिका सध्या अव्वल ठरतेय. टिकटॉक आणि हॅलो सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर जिवलगा’ हॅशटॅग ट्रेण्ड होतोय आणि इथेही जिवलगा ही मालिका नंबर वन ठरतेय. एकंदरीतच तरुणाईमध्ये या मालिकेविषयी प्रचंड कुतुहल आहे.

स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी दमदार स्टारकास्ट, उत्कंठावर्धक कथानक आणि ग्लॅमरस लूकमुळे या मालिकेला प्रेक्षकवर्गात पसंती मिळताना दिसतेय. जिवलगा’ मालिकेचं कथानक सध्या खूपच इन्ट्रेस्टींग वळणावर येऊन पोहोचलंय. निखिल आणि काव्याच्या प्रेमप्रकरणाविषयी विधीला कळलंय. निखिल जरी विधीपासून ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असला तरी विधीपासून कोणतीही गोष्ट लपून राहिलेली नाही. या भावनिक वळणावर विधीचा निर्णय काय असेल याची उत्कंठावर्धक गोष्ट जिवलगा मालिकेच्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी न चुकता पाहा जिवलगा सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Jivlaga (जिवलगा) Trending On Hotstar
‘हॉटस्टार’ वर ‘जिवलगा’ मालिका ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय