अवघ्या महाराष्ट्राचं आनंदनिधान असलेल्या पंढरीच्या आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये देखील शिवा आणि सिद्धी पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होताना दिसणार आहेत… भगवा झेंडा, शिवाच्या हातातील टाळ, वारीमधील गावकऱ्यांचा सहभाग आणि “जय जय रामकृष्ण हरी” या जयघोषात संपूर्ण वातावरण मंगलमय झाले आहे… सगळी भांडण, हेवेदावे विसरून या खास क्षणासाठी शिवा आणि सिद्धी एकत्र आले आहेत, जणूकाही पांडुरंगानेच त्यांना एकत्र आणले आहे… हा खास भाग प्रेक्षकांना जीव झाला येडापिसा मालिकेत या आठवड्यामध्ये रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.
वारीची परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे. पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. संपूर्ण महाराष्ट्र पांडुरंगाच्या गजरात तल्लीन झाला आहे… संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखो भक्त वारीसाठी येतात… आणि आता हेच भक्तीमय वातावरण जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.