मितेश तांडेल चा अभिनंदनीय प्रयत्न..

मितेश तांडेल चा अभिनंदनीय प्रयत्न..

आज कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातलं आहे. सरकारने संपूर्ण भारत बंद ठेवला आहे. मात्र अश्या कठीण परिस्थितीत सुद्धा माणसातले देव म्हणजेच डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, पोलिस आणि नागरी कर्मचारी हे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आपले कर्तव्य बजावत आहेत. स्वतःच्या कुटुंबापासून लांब राहून संपूर्ण समाजाच्या हितासाठी धडपडणाऱ्या या रक्षकांना मितेश तांडेल ने वेगळ्या पद्धतीने सलाम केला आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेक व्हिडिओ कलाकार आणि इतर माध्यमांद्वारे करण्यात आले परंतु मितेश ने यामध्ये कोणतेही कलाकार न घेता एका उत्कृष्ट शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. ‘कोरोना को रोकना है’ असे या शॉर्टफिल्मचे नाव असून मितेशच्या यूट्यूब चॅनेलवर ही प्रदर्शित देखील झाली आहे. या शॉर्टफिल्म चे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः मितेश ने केले असून याचे म्युझिक तेजस पाडवे याने केले आहे आणि यातील एक आवाज आराध्या गावतेचा असून याची कॅलिग्राफी पवन लोणकर यांनी केली आहे.

या उत्कृष्ट निर्मितीला होऊदे व्हायरल चा सलाम..

Corona Ko Rokna Hai

मितेश तांडेल चा अभिनंदनीय प्रयत्न..