BIGG BOSS मराठी’चा Grand Premiere आज रात्री ९ वा. फक्त कलर्स मराठीवर
“मी रितेश विलासराव देशमुख…” असं म्हणत महाराष्ट्राचा लाडका दादा अर्थात रितेश भाऊने ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये अखेर ग्रॅंड एन्ट्री घेतली आहे. घरातील सदस्यांवर आपली भुरळ पाडायला रितेश भाऊ सज्ज आहे. रितेश भाऊ आणि कमाल स्पर्धकांमुळे ‘बिग बॉस’प्रेमींना मनोरंजनाचा मोठा खजिना मिळणार आहे. बहुप्रतिक्षित ‘बिग बॉस मराठी’चा ग्रॅंड प्रीमियर अखेर आज होणार आहे.
रितेश भाऊच्या शानदार एन्ट्रीचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रितेश देशमुख हे नाव ऐकलं नाही असं महाराष्ट्रात एकही गाव नाही. त्यामुळेच तर प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय, “धरल्याबगर सोडलं नाय तर रितेश विलासराव देशमुख आपलं नाव नाही”. एकंदरीत काय तर नव्या पर्वाची शानदार सुरुवात झाली असून सबका भाईच्या ग्रॅंड अंदाजाचं सर्वत्र कौतुक होणारचं. सगळचं कसं ‘लय भारी’ आहे.
‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. रितेश भाऊच्या प्रोमो व्यतिरीक्त आतापर्यंत सदस्यांचे अनेक नॉन रिव्हिल प्रोमो आऊट झाले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये कोणते सदस्य असतील, घरात काय राडा आणि धमाका करणार, हे जाणून घेण्यास सारेच उत्सुक आहेत. तसेच ‘बिग बॉस मराठी’चं घर कसं असेल? यंदाची थीम काय? रितेश भाऊ काय वेगळेपण घेऊन येणार अशा सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आज मिळणार आहेत.
मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी”चा Grand Premiere आज २८ जुलै, रात्री ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.