प्रेक्षकांसाठी अतुल अरुण दातेंचा स्वर्गीय सुरांचा नजराणा – ‘अलौकिक स्वरांचा प्रवास’ एक सांगीतिक चमत्कार

Alaukik Swarancha Pravas

‘मंगेशकर’ -भारतीय संगीत सृष्टीतील सुरेल नजराणा! मा.दीनानाथांनी हे स्वरबीज रोवले आणि तयाचा वेलू गगनावरी तर गेलाच, पण वटवृक्ष होऊन समस्त गान प्रेमींना आपल्या सुरांच्या छायेत घेऊ लागला. मंगेशकरांच्या स्वरांनी रसिकांना तृप्त केलेच, त्यांनी दिलेल्या संगीतानेही उभा महाराष्ट्र समृद्ध झाला.

मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यांवर जरी अनेक कार्यक्रम होत असले, तरी चार मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवरील हा कार्यक्रम अभिनव ! माणिक निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत ‘अलौकिक स्वरांचा प्रवास’ !

अलौकिक स्वरांचा प्रवास

मा.दीनानाथ, स्वर सम्राज्ञी लता दीदी, पंडित हृदयनाथ, मीनाताई या चार मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांतील विविधता आणि कलात्मकता आपल्याला अचंबित करते. नाट्यगीतांपासून प्रेमगीतांपर्यंत, भावगीतांपासून लावणी , चित्रपटगीतांपर्यंत सगळच यात येतं आणि वाटतं, हे चार मंगेशकर म्हणजे सांगितीक चमत्कार आहेत नक्कीच. या कार्यक्रमात आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत गायिका स्वाती आपटे, पल्लवी पारगावकर, विद्या करलगीकर आणि गायक – संगीतकार मंदार आपटे. यासोबतच अमेय ठाकूरदेसाई, प्रणव हरिदास, जयंता बगाडे, सौरभ शिर्के, झंकार कानडे आणि सागर टेमघरे या वादकांची उत्तम साथ त्यांना लाभणार आहे. तसेच ध्वनी संयोजनची धुरा सांभाळणार आहेत अशोक पवार. संहिता तसेच निवेदन मृण्मयी भजक करणार आहेत. तसेच संवादकाच्या भूमिकेत असतील निर्माते अतुल अरुण दाते ज्यांनी या पूर्वीही अनेक सांगितिक पर्वणी असलेले कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर केलेले आहेत. हे सर्व कलाकार आपली कला सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज आहेत.

Alaukik Swarancha Pravas

चला चिंब होऊया मंगेशकरी स्वर धारांमध्ये!

हा स्वर्गीय “अलौकिक स्वरांचा प्रवास” आम्ही उलगडणार आहोत नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ३ जानेवारी २०२५ ला रात्री ८ वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, मुंबई येथे आणि तेही संगीतश्रेष्ठ श्रीमती मिनाताई मंगेशकर ( खाडिकर ) ह्यांच्या विशेष उपस्थितीत.

ह्या अलौकिक सोहळ्याचा लाभ तमाम मराठी जाणकार रसिकांनी घ्यावा ही विनंती. आमच्या जेष्ठ नागरिकांना ५०० व ४०० रुपयांच्या तिकिटावर ५०% सवलत, इतर तिकिटं ३०० व २०० रुपये असतील. सुरेल गायक, अप्रतिम निवेदन उत्तम वादक आणि निष्णात तंत्रज्ञ ह्यांच्या सोबत आनंद घेऊयात, नक्की आधीच आपली सीट बुक करा रसिकहो. तिकीट विक्री नाट्यगृहावर १, २ व ३ जानेवारीला सकाळी ९-११ वा. सायंकाळी ६-८ ह्या वेळात करण्यात येईल. फोन बुकिंग साठी अतुल अरुण दाते ह्यांच्याशी त्यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा – 9867200709..

Alaukik Swarancha Pravas