‘कलर्स मराठी’वर ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीतच ‘आई तुळजाभवानी’ची ही महागाथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पहिल्याच आठवड्यात मालिकेत पाहायला मिळालं की पार्वती माता तुळजाभवानीचं रूप घेत भूतलावर अवतरली. असूरांनी जो काही हाहाकार माजवला होता त्यासाठी भक्तांच्या रक्षणासाठी ती भूतलावर आली आणि ती जगतजननी झाली. आई तुळजाभवानीने वक्रासूराचा वध केला. भक्तांचं असूरांपासून रक्षणचं नाही केलं तर तिच्या प्रिय भक्ताला म्हणजेच कर्दम ऋषींची पत्नी अनुभूतीलादेखील सती जाण्यापासून रोखले. अशा प्रकारे आई तुळजाभवानीचे दिव्यरुप प्रेक्षकांना मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आई तुळजाभवानी’ धुम्रासुराचा वध करताना दिसणार आहे.
दैत्यमाता दीती, शिवशक्ति एकत्र येऊ नये म्हणून थेट युद्ध न करता एक आगळी वेगळी योजना आखत धुम्रासुर हा मायावी दैत्य आश्रमात पाठवते, जेणेकरून आश्रमातली दैवी शक्ति समोर येईल. धुम्रासुर झोपेत माणसाच्या स्वप्नात शिरून वार, जखमा करतो, ज्या प्रत्यक्ष अंगावर उमटतात शिवाय या जखमांचा वेढा शरीराला पूर्ण वेटोळे घालतो. तेव्हा ती व्यक्ति मरते. कुणी हल्ला केला ठाऊक नाही प्रतिकार कसा करायचा हे कळत नाही. असा हा मायावी असुर आहे.
देवीच्या भेटीला नारद येतात, देवीकडून बोलण्याच्या ओघात निघून जाते आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. महादेव धुम्रासुर राक्षस आश्रमात घुसल्यामुळे गंभीर होतात. मात्र नारदमुनी कळ लावतात देवींना कोणाच्याही मदतीची गरज नाही, महादेव कैलासावरच थांबतात. आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका नक्की पाहा.
पहा ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर
#AaiTuljaBhawani #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari