नव्या वर्षात अरुंधती करणार आयुष्याची नव्याने सुरुवात

Aai Kuthe Kay karte

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्धकडून फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता अरुंधती स्वयंपूर्ण झाली आणि कठीण प्रसंगात तिने स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला सावरलं. एरव्ही अरुंधतीचा वाढदिवस कुणाच्या लक्षात रहात नसे. पण यंदा मात्र यश आणि गौरीने मिळून अरुंधतीच्या वाढदिवसाचं दिमाखदार सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे. त्यासाठी जोरदार प्लॅनिंगही सुरु झालं आहे. अरुंधतीच्या वाढदिवसाचं अनिरुद्धलाही निमंत्रण असणार आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती एक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. हा निर्णय नेमका काय असणार ? या निर्णयाचे संपूर्ण कुटुंबावर कसे पडसाद उमटणार ? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

आजवर अरुंधतीचं खंबीर रुप प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यामुळे अरुंधती नवीन वर्षात तिच्या आयुष्याची नव्याने कशी सुरुवात करते हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी न चुकता पाहा ‘आई कुठे काय करते’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Aai Kuthe Kay karte Aai Kuthe Kay karte