अनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय?

Aai Kuthe Kay Karte New Twist

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका रंजक वळणावर

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्ताने सुरु असलेल्या कार्यक्रमातच अरुंधतीला अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी कळलं, त्याक्षणी ती कोलमडली. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. कोणत्याही स्त्रीचं आयुष्य हादरवून टाकेल असा हा प्रसंग. अरुंधतीही या प्रसंगामुळे हादरली. तिचं असं वागणं सर्वांनाच भ्रमात टाकणारं होतं. अरुंधती या सर्वातून कशी आणि कधी बाहेर पडणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अरुंधती या मानसिक धक्यामधून नक्कीच बाहेर पडेल आणि ती अनिरुद्धला याचा जाबही विचारेल. २६ सप्टेंबरच्या विशेष भागात अरुंधतीचं एक वेगळं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

अनिरुद्धने जरी अरुंधतीची फसवणूक केली असली तरी तिच्यासोबत तिची मुलं, सासू-सासरे आणि संपूर्ण कुटुंब आहे. कुटुंबाची भरभक्कम साथ असताना अरुंधती या परिस्थीतीतून कसा मार्ग काढते हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Aai Kuthe Kay Karte New Twist