Home TV Serials स्टार प्रवाहवर सुरु होणार नवाकोरा कार्यक्रम : मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा

स्टार प्रवाहवर सुरु होणार नवाकोरा कार्यक्रम : मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा

Mi Honar Superstar

अभिनेता अंकुश चौधरी दिसणार सुपरजजच्या भूमिकेत तर संस्कृती बालगुडे करणार सूत्रसंचालन

स्टार प्रवाहवर येत्या २१ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. या नव्या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातले एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवतील. गृप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळतील. मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे अभिनेता अंकुश चौधरी. तर संस्कृती बालगुडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. हिंदी रिऍलिटी शो गाजवणारे नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे आणि कृती महेश या शो चे कॅप्टन आहेत.

या ग्रॅण्ड रिऍलिटी शो विषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे.’

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना संस्कृती म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबत मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडली गेले आहे. मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं वेगळेपण सांगायचं तर या मंचावर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं भन्नाट टॅलेंट. स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सेस पाहून अवाक व्हायला होतं. नृत्य ही माझी आवड आहे. माझ्या करिअरची सुरुवातच नृत्याने झाली. त्यामुळे हा मंच नवी ऊर्जा देतो. मी पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडते आहे त्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि कृती महेश यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असणार आहे अशी भावना संस्कृतीने व्यक्त केली.’

तेव्हा पाहायला विसरु नका नवा कार्यक्रम मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा २१ ऑगस्टपासून दर शनिवार रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Mi Honar Superstar Mi Honar Superstar