सूर नवा ध्यास नवा महाअंतिम सोहळा २ फेब्रुवारी रोजी कलर्स मराठीवर !

Sur Nava Dhyas Nava
सूर नवा ध्यास नवा महाअंतिम सोहळा २ फेब्रुवारी रोजी कलर्स मराठीवर ! प्रेक्षकांना मिळणार पद्मश्री हरिहरनजींच्या सुरेल सुरांची अनुभूती...

“प्रेक्षकांना मिळणार पद्मश्री हरिहरनजींच्या सुरेल सुरांची अनुभूती…”

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातील सुरवीरांच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला तब्बल चारहून अधिक महीने मंत्रमुग्ध केले, त्यांच्या सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली, हे सुरवीर आता सज्ज आहेत महाअंतिम सोहळ्यासाठी. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील आणि जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या सुरवीरांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला आणि आता हाच आनंद अधिक वाढणार आहे… महाअंतिम सोहळ्यामध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे हे निश्चित ! या महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांची स्वप्नपूर्तीच झाली असे म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या सुरांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे, पद्मश्री हरिहरन यांचा आशिर्वाद आपल्या सुरवीरांना लाभला हे त्यांचे भाग्यच असे म्हणायला हरकत नाही… सूर नवा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा बहरणार विशेष उपस्थिती म्हणून लाभलेल्या पद्मश्री हरिहरनजींच्या सूरांनी… तेंव्हा तुम्ही देखील साक्षी व्हा या महाअंतिम सोहळ्याचे २ फेब्रुवारी रोजी संध्या. ७ वा कलर्स मराठीवर.

महाअंतिम सोहळ्यामध्ये पद्मश्री श्री. हरिहरनजींनी जोगवा चित्रपटातील जीव दंगला, गुंगला, रंगला असा… हे गाणे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि सोहळ्याची रंगत अजूनच वाढवली. तसेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अवधूत दादाने त्याची काही निवडक गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

याचसोबत आपल्या लाडक्या मॉनिटरची धम्माकेदार एन्ट्री झाली. हर्षदचे धूआदार गाणे आणि एकूणच त्याच्या हजरजबाबीपणा, लाघवी बोलणे यांनी उपस्थितांचे मन तर जिंकलेच पण अवघ्या महाराष्ट्राचे मन तो पुन्हा एकदा जिंकणार यात शंका नाही. याचसोबत त्याच्या सादरीकरणाने हरिहरनजींना देखील चकित केले. आपल्या TOP ६ यांनी देखील एका पेक्षा एक गाणी या ग्रँड फिनालेमध्ये सादर केली आहेत. अमोल घोडके महाअंतिम सोहळ्यामध्ये चल ग सखे या सादर केलेल्या गाण्यावर पद्मश्री हरिहरनजींनी खास उभं राहून दाद दिली. तर रविंद्र खोमणे याच्या देवा श्री गणेशा या गाण्याने सोहळ्यात वेगळाच उत्साह आणला. असे आणि अजून बहारदार गाणी ऐकण्यासाठी नक्की बघा सूर नवा ध्यास नवा महाअंतिम सोहळा…

तेंव्हा तुम्ही देखील साक्षी व्हा या  महाअंतिम सोहळ्याचे २ फेब्रुवारी रोजी संध्या. ७ वा कलर्स मराठीवर.