सोशल मीडिया चा गैरवापर थांबवा- कुणाल हेरकळ (निर्माता / संस्थापक होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट)

Stop Misusing Social Media Says Kunal Herkal
सोशल मीडिया चा गैरवापर थांबवा- कुणाल हेरकळ (निर्माता / संस्थापक होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट)

सध्या लॉकडाऊन च्या काळात अनेक ऑनलाईन स्कॅम आपल्या समोर आले. देशात आणि देशाबाहेर ऑनलाईन इव्हेंट आणि चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट चे निर्माते श्री. कुणाल हेरकळ यांनी नुकत्याच अश्या झालेल्या एका प्रकरणाची माहिती दिली. प्रसिद्ध अभिनेते मंदार चांदवडकर याच्या नावाने सध्या इंस्टाग्राम वर अनेक फेक अकाउंट्स तयार करण्यात आले आहेत. मंदार चांदवडकर काही दिवसांपासून त्यांचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांच्या फेक पेज मुळे हे शक्य होत नव्हते काही ना काही कारणास्तव ते इंस्टाग्राम खाते बंद केले जायचे. याच दरम्यान मंदार यांची भेट कुणाल हेरकळ यांच्याशी झाली. सर्व होणारी परिस्थिती जाणून घेऊन कुणाल यांनी मंदार यांचे एक नवीन खाते तयार केले मात्र १ दिवसात ते खाते इंस्टाग्राम ने बंद केले. त्यानंतर कुणाल यांनी सलग आठ दिवस सर्व तांत्रिक बाबींचा पाठपुरावा करत मंदार चांदवडकर यांचे अधिकृत खाते सुरू केले. आणि उपाययोजना देखील केल्या जेणेकरून ते पुन्हा बंद केले जाणार नाही. कुणाल यांनी आमच्याशी बोलताना सांगितले मंदार यांचे फेक खाते तयार करणाऱ्या व्यक्ती ह्या १८ वर्ष वयोगटाच्या आतील आहेत आणि काही फेक खात्याचे फॉलोअर्स जास्त असल्यामुळे मंदार यांचे अधिकृत खाते इंस्टाग्राम फेक समजून बंद करीत होते. कुणाल यांनी आवाहन केले कृपया प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने फेक अकाउंट्स तयार करू नका हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांच्या नावाचे फेक अकाउंट तयार करून तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकत नाही. त्या अकाउंट मुळे त्या कलाकाराला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. सोशल मीडिया हे लोकांच्या संपर्काचे आणि माहितीचे स्रोत आहेत याठिकाणी अशा घटना होत राहिल्या तर आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असेल.

सध्या अनेक कलाकारांच्या नावाचे अनेक फेक पेजेस इंस्टाग्राम आणि फेसबुक वर आहेत. याआधी या फेक पेजेस वरून कलाकारांच्या नावाने लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार देखील घडले आहेत. आपण सोशल मीडिया चा वापर करताना सतर्क राहायला हवे. प्रसिद्ध व्यक्तीला शक्यतो इंस्टाग्राम ने व्हेरिफिकेशन दिलेले असते. त्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींना फॉलो करताना व्हेरिफिकेशन आहे का ? नसेल तर पोस्ट तपासून अधिकृत खाते असल्याची खात्री करूनच फॉलो करावे आणि कोणी सोशल मीडिया वरून एखाद्या कलाकाराच्या नावे पैशाची मागणी करीत असल्यास लगेच त्या खात्याची माहिती जवळच्या पोलिस यंत्रणेला द्या असे आवाहन कुणाल यांनी जनतेला केले आहे.