श्री लक्ष्मीच्या पदरी गृहप्रवेशाच्या दिवशी येणार पती विरह…

Shree Lakshminarayan Narayan Meets Vedvati
श्री लक्ष्मीच्या पदरी गृहप्रवेशाच्या दिवशी येणार पती विरह…

“श्री विष्णु लक्ष्मीचा रोष कसा दूर करतील ?”

श्री लक्ष्मीनारायण मालिकेमध्ये नुकताच लक्ष्मी नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा पार पडला… देव देवतांच्या साक्षीने विवाह सोहळ्याच्या सर्व विधी पार पडल्या गेल्या… या सोहळ्यामध्ये अलक्ष्मीने कोणत्याही प्रकारचं विघ्न आणू नये म्हणून तिला एका खोलीमध्ये ठेवण्यात आले होते कारण तीचा या विवाहाला पहिल्यापासूनच विरोध होता… परंतु आता लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडला असून, वैकुंठामध्ये श्री लक्ष्मीचा मोठ्या थाटामाटात गृहप्रवेश होणार आहे… याचवेळी पृथ्वीलोकावर नारायणांच्या भक्ताला त्यांच्या दर्शनाची आस लागली आहे आणि त्यामुळेच ही भक्त विष्णु सहस्त्रनामावलीचा जप करण्यात मग्न आहे… आणि ही भक्त म्हणजे वेदवती…. वेदवती नारायणाच्या भेटीसाठी आतुर आहे… भक्ताच्या हाकेला श्री विष्णु ऐकून दर्शन देण्यासाठी पृथ्वीलोकावर येतात.

लक्ष्मी आणि नारायण यांचा संसार आता कुठे सुरू होत आहे… श्री लक्ष्मीच्या गृहप्रवेशाच्या दिवशीच त्यांच्या पदरी पतीचा विरह आल्याने श्री लक्ष्मीचा ओढावलेला रोष विष्णु कसा दूर करतील ? यावर काय मार्ग काढतील ? हे बघणे रंजक असणार आहे … तेंव्हा नक्की बघा श्री लक्ष्मीनारायण सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Shree Lakshminarayan Narayan Meets Vedvati
श्री लक्ष्मीच्या पदरी गृहप्रवेशाच्या दिवशी येणार पती विरह…