स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेची उत्सुकता

Sang Tu Aahes Ka

सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे, सानिया चौधरी प्रमुख भूमिकेत

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी अशीच एक हटके आणि नव्या धाटणीची मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘सांग तू आहेस का’. सध्या या मालिकेच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही असं म्हणतात. ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या निमित्ताने अशीच एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. खास बात म्हणजे लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या मालिकेत मुख्य भूमिकेत असून ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता ही मालिका भेटीला येणार आहे.

या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘एखादी गोष्ट रसिकांना खिळवून ठेवते त्यांची उत्कंठा वाढवते असं ऐकलं की ती गोष्ट सांगायला अजून हुरुप येतो. सांग तू आहेस का अशीच मालिका आहे. त्याचं कथानक अनेक प्रश्न पडत पुढे पुढे सरकणारं आहे. लव्हस्टोरी आणि त्यात गूढ असा या मालिकेचा बाज असल्यामुळे पुढे काय उलगडेल याची हुरहुर सतत मनाला लागून राहिल.’

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘सांग तू आहेस का’ या मालिकेचे निर्माते विद्याधर पाठारे असून दिपक नलावडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Sang Tu Aahes Ka Sang Tu Aahes Ka Sang Tu Aahes Ka