का आहे रणजीत संजुवर नाराज ?

Ranjit And Sanjivani's First Fight - Raja Ranichi G Jodi
का आहे रणजीत संजुवर नाराज ?

कोणती गोष्ट रणजीतसमोर उघडकीस येणार ??

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये सध्या रणजीत आणि संजीवनीचं नात छान फुलू लागलं आहे… पण, दुसरीकडे संजीवनी कुसुमावती यांचे मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे … कुसुमावती संजीवनीला वेळोवेळी तिच्या चुका दाखवून देत आहेत ढाले पाटील यांच्या सुनांनी चालीरीती, नियम यांचा मान ठेऊन राहणे गरजेचे आहे याची जाणिव देखील करून देत आहेत. आता मात्र त्यातील काही गोष्टी रणजीतला खटकु लागल्या आहेत… पण संजीवनीच्या सांगण्यावरून तो गप्प आहे… ढाले पाटील यांच्या घरामध्ये संजीवनीचे आणि बेबी मावशीचे खूप चांगले नाते प्रेक्षकांना बघायला मिळत आहे, पण आता अजून एक नात हळूहळू तयार होते आहे ते म्हणजे सुजीत भाऊजी आणि संजीवनीचे… हे सगळे नीट सुरू असतानाच आता रणजीत आणि संजीवनीचे छोटे भांडण होणार आहे… संजीवनीवर रणजीत एका गोष्टीवरून खूप नाराज आहे… ती गोष्ट काय आहे ? संजीवनीने अशी कोणती गोष्ट रणजीतपासून लपवली आहे ? कोणत्या गोष्टीचा उलघडा रणजीतसमोर होणार आहे ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे…

राजश्रीने नुकतीच कुसुमावतीच्या सांगण्यावरून संजुची पत्रिका मागवली आहे… संजु अल्पवयीन आहे हे घरामध्ये कोणालाच माहिती नाही… कारण पंजाबरावांच्या सांगण्यावरून संजुने ती गोष्ट कोणालाच संगितली नाही… याबाबतीत तर कुठलं सत्य रणजीतसमोर येणार नाही ना ? संजु कशी सामोरी जाणार या घटनेला ? पंजाबरावांच्या चुकीची शिक्षा संजुला तर मिळणार नाही ना ? हे बघूया राजा रानीची गं जोडी मालिकेच्या येत्या भागामध्ये सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Ranjit And Sanjivani's First Fight - Raja Ranichi G Jodi

Ranjit And Sanjivani's First Fight - Raja Ranichi G Jodi
का आहे रणजीत संजुवर नाराज ?