स्वामिनी मालिकेमध्ये रंगला रमा माधवचा विवाहसोहळा !

Rama Madhav's Wedding - Swamini
स्वामिनी मालिकेमध्ये रंगला रमा माधवचा विवाहसोहळा !

“स्वामिनी सोम ते शनि रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर”

आणि अखेर तो क्षण आला, सगळ्या अडचणींना, परीक्षांना पार करून आता शिवाजी जोशी यांची कन्या म्हणजेच रमाची लग्नगाठ पेशवे माधवराव यांच्याशी बांधली जाणार आहे… शनिवारवाडा अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी ठरला, अनेक सोहळे त्याने पाहिले, पेशव्यांच्या सुखात सहभागी झाला आणि दु:खात खंबीरपणे तटस्थ उभा राहिला हाच शनिवारवाडा साक्षी होता एका विलक्षण प्रेमकहाणीचा… रमा आणि माधवची प्रेमकहाणी याच शनिवारवाड्यात बहरली… या वाड्यात लहानगी रमा लग्न होऊन आली आणि संपूर्ण पेशवाईला एक वेगळी कलाटणीच मिळाली जणू… रमा – माधवच्या लग्नसोहळ्या बद्दल आपण बरेच ऐकून आहोत पण, आता तो प्रत्यक्षात बघायला मिळाला आहे… पेशवाई थाटमाट, सनई चौघडे, रोषणाई यामध्ये रमा आणि माधव लग्न बंधनामध्ये बांधले गेले आहेत… शनिवारवाडा, संपूर्ण पेशवाई सज्ज आहे रमा – माधवचे स्वागत करण्यासाठी… तेंव्हा नक्की बघा “स्वामिनी” सोम ते शनि आणि रविवारी सुध्दा रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले आता ती भावी काळात येणार्‍या जबाबदार्‍या कशी पार पाडेल ? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. रमा – माधव यांची नावे सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानावर कोरली गेली. माधवरावांचे रमावर असलेले अपार प्रेम, रमाबाईंनी केलेला त्याग याला पेशवाई साक्ष आहे… हे सगळे कसे घडले ? रमा – माधव यांचा हा प्रवास कसा होता ? त्यांना कोणाची साथ लाभली ?  गृह कलह, घरातील राजकारण हे होत असतानाच रमाने पेशवाईचा भार कसा सांभाळला या नव्या अध्यायाचे तुम्ही देखील साक्षी व्हा !

 

Rama Madhav's Wedding - SwaminiRama Madhav's Wedding - SwaminiRama Madhav's Wedding - SwaminiRama Madhav's Wedding - SwaminiRama Madhav's Wedding - SwaminiRama Madhav's Wedding - SwaminiRama Madhav's Wedding - SwaminiRama Madhav's Wedding - Swamini

Rama Madhav's Wedding - Swamini
स्वामिनी मालिकेमध्ये रंगला रमा माधवचा विवाहसोहळा !