नियतीच्या या खेळात कसं जुळणार ‘शुभम-कीर्ती’चं नातं…?

New Twist In Phulala Sugandh Maticha - Star Pravah

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेत नवा ट्विस्ट

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. शुभम आणि कीर्तीच्या बाबतीतही काहीसं असंच घडताना दिसतंय. बॉम्बस्फोटामध्ये आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर कीर्तीचा भाऊ तिच्यासाठी स्थळ शोधतोय. तर तिकडे शुभमचं लग्न मोडल्यामुळे जीजी अक्कांनीही पंधरा दिवसात चांगली सून शोधण्याचा चंग बांधलाय. कमी शिकलेली मुलगी हवी हा त्यांचा हट्ट आहे. तर तिकडे खूप शिकून आयपीएस अधिकारी होण्याची स्वप्न कीर्ती रंगवतेय. तसं पाहिलं तर शुभम आणि कीर्ती म्हणजे दोन वेगळे किनारे आहेत. नियतीच्या या खेळात शुभम आणि कीर्तीचं नातं कसं जुळणार याची उत्सुकता आहे. २४ सप्टेंबरच्या विशेष भागात शुभम आणि कीर्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा नवा ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे.

 

 

उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असे भाग ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या यापुढील भागांमधून पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी नक्की पाहा फुलाला सुगंध मातीचा रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

New Twist In Phulala Sugandh Maticha - Star Pravah